NCP and Congress Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

सरकारनामा ब्यूरो

Hingna constituency should be given to Congress in Mahavikas Aghadi : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवत आली आहे. पण २००९सालापासून येथे राष्ट्रवादीला सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसला देण्यात यावा, अशी मागणी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या युवक कॉंग्रेसच्या बैठकीत करण्यात आली. (Vijay Ghodmare had become MLA on BJP ticket)

२००९साली हिंगण्यातून भाजपच्या तिकिटावर विजय घोडमारे आमदार झाले होते. २००९ ते २०१४ या काळात घोडमारे यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीत भाजपने येथे उमेदवार बदलला आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे चिरंजीव समीर मेघे यांना उमेदवारी दिली. ते निवडून आले आणि २०१९मध्येही जनतेने पुन्हा त्यांनाच पसंती दिली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी येथे सातत्याने पराभूत होत आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने हिंगण्यावर दावा केला आहे.

नुकतेच राष्ट्रीय युवक काँग्रेसची सभा संपन्न झाली.यात युवक काँग्रेसचे राज्य सचिव वाडी निवासी अश्विन बैस यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या कोट्यात देण्याची मागणी केली आहे. बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलवर, राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी., महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाला राऊत सहभागी झाले होते.

हिंगणा विधानसभा क्षेत्राचा संघटनात्मक अहवाल सादर करताना अश्विन बैस यांनी सांगितले की, मागील ४० वर्षापासून हिंगणा विधानसभा क्षेत्र आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. परंतु मागील तीन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला या क्षेत्रात अपयश आले आहे. यामुळे आता ही जागा काँग्रेसच्या कोट्यात देण्याची त्यांनी मागणी केली आहे.

काँग्रेसचे या क्षेत्रात संघटन वाढेल व निश्चितपणे ही जागा काँग्रेस (Congress) जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत ही जागा काँग्रेसला देण्याचा पुरजोर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पंकज फलके, मिथुन वायकर,फैजल कुरेशी, आशिष मंडपे, इर्शाद शेख, बाबा बागडे, राजा करोटे इत्यादी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT