BRS Nagpur News : उपराजधानीत बीआरएसचा पहिला दणका राष्ट्रवादीला !

NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपराजधानीतील नेत्यांमध्ये दम नाही.
BRS and NCP
BRS and NCPSarkarnama
Published on
Updated on

NCP has started to feel it : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा आहे. केंद्रातही त्यांचे चांगले वजन आहे. असे असतानाही राज्याच्या उपराजधानीत राष्ट्रवादी अजूनही चाचपडताना दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपराजधानीतील नेत्यांमध्ये दम नाही. त्यामुळे पक्षाची अशी वाईट अवस्था झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. (There is talk among the workers that the party is in such a bad state)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसचा (भारत राष्ट्र समिती) सर्वाधिक धोका आता राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवू लागला आहे. गेल्या आठवडाभरात जवळपास सत्तर ते अंशी पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीला सोडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षांपासून नागपूर शहरात चाचपडतच आहे. गिरीश गांधी, अनिल देशमुख, अशोक धवड, अजय पाटील, प्रवीण कुंटे पाटील, अनिल अहीरकर या नेत्यांना सुरुवातीला अध्यक्ष करण्यात आले होते.

यांपैकी राष्ट्रवादीला कोणालाही मोठे करता आले नाही. गांधी, धवड, पाटील यापूर्वीच पक्षातून बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादी शहरात वा विदर्भात वाढत का नाही, याचे उत्तर कोणालाच अद्याप सापडले नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत अनेकदा स्थानिकांना विचारणा केली. जाहीर कार्यक्रमात नाराजीही दर्शवली. मात्र काही फरक पडला नाही. आता तर मोठ्या नेत्यांनी नागपूरकडे लक्ष देणेच सोडून दिले आहे.

काँग्रेस (Congress) आघाडीसोबत लढत असताना चार-पाच नगरसेवकही निवडून येत होते. मागील महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला. पक्षाच्या विस्तारासाठी राष्ट्रवादीने अनिल अहीरकर यांना बदलवले. युवा नेता म्हणून एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवले. त्याचाही फायदा होताना दिसत नाही. उलट नाराजी जास्त उफाळून आली आहे.

BRS and NCP
BRS News : भाजपच्या पावलावर बीआरएसचे पाऊल, त्यांच्याच बालेकिल्ल्यातून सुरुवात; गुलाबी वादळ येणार?

काही दिवसांपूर्वी पेठे यांनी विधानसभेचे अध्यक्ष बदलताच असंतोष उफाळून आला. दक्षिणचे अध्यक्ष सुखदेव वंजारी बीआरएसमध्ये सहभागी झाले. दक्षिणच्या महिला अध्यक्षा सुषमा बंगाले यांच्यासह दक्षिण आणि पूर्व नागपूरमधील (Nagpur) साठ ते सत्तर लोक बीआरएसमध्ये सहभागी झाले आहेत.

दक्षिणचे उपाध्यक्ष सुनील भिवगडे, प्रभाग अध्यक्ष ॲड. चेतन कुंभारे, विद्यार्थी काँग्रेसचे हिमांशू पंचबुधे, प्रभाग अध्यक्ष नितीन अंबरते, दक्षिणचे महासचिव राहुल पाचघरे, सचिव सचिन घंगारे तसेच वाडी, लावा, दाभा, खडगाव, कळमेश्वर येथील सुमारे पाच डझन पदाधिकारी बीआरएसच्या संपर्कात आहेत.

BRS and NCP
BRS- VBA घेरणार ? MVA ची कोंडी करणार ? | Sharad Pawar | Congress | NCP | Mahrashtra Elections 2024

दोघांची घरवापसी..

पाच दिवसांपूर्वी बीआरएसमध्ये प्रवेश करणारे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष जावेद हबीब आणि रुपेश पन्नासे यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com