Abhijeet Wanjari  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress News : पूर्व विदर्भातील ‘या’ आमदाराचा 'पूर्वे'कडे वाढतोय जोर; ‘पंजा’ला येतेय बळकटी !

BJP : या मतदारसंघात सातत्याने भाजपचे कमळ उमलले आहे.

Atul Mehere

Nagpur City Political News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात भाजपचा गड भक्कम आहे. परंतु भाजपच्या या गडाला ऐतिहासिक पद्धतीने भगदाड पडणाऱ्या नागपुरातील एका आमदाराला सध्या 'पूर्व' दिशा लाभदायक ठरतेय. (In this constituency, the lotus of BJP has blossomed consistently)

नागपूर पदवीधर मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून या मतदारसंघात सातत्याने भाजपचे कमळ उमलले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला धोबीपछाड देत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी इतिहास रचला. भाजपचे बाहुबली नेता देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले माजी महापौर संदीप जोशी यांचा पराभव करीत वंजारी यांनी भाजपचा बुरुज पाडला.

हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आमदार अभिजित वंजारी आता पूर्व नागपूरमध्ये अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेत आमदार असतानाही सध्या आमदार अभिजित वंजारी यांनी पूर्व नागपूरमध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून रस घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्व नागपूर कृष्णा खोपडे हे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. सध्या ते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून 'पूर्व' मध्ये 'पंजा'ची बळकटी बऱ्यापैकी वाढत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून 'कमळ' फुलण्यासाठी अडचणी निर्माण होतात की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण वर्तुळात आपला दबदबा असणारे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांचे 'हौसले' निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच बुलंद आहेत. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येत आहे, तसतसे आमदार वंजारी पूर्व नागपुरात अधिक आक्रमकपणे सक्रिय होताना दिसत आहेत.

बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, विविध कार्यशाळा, उपक्रम यांच्या माध्यमातून आमदार वंजारी यांचा जनसंपर्क चांगलाच वाढला आहे. अलीकडेच त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले. त्यातून त्यांनी हिंदुत्व व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांशीही जवळीक साधली. आमदार वंजारी यांचा हा वाढता प्रभाव अन्य पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

अभिजित वंजारी विधान परिषदेचे आमदार असतानाही पूर्व नागपूरसारख्या विधानसभा मतदारसंघात इतक्या आक्रमकपणे ते का जनसंपर्क वाढवत आहेत, याबाबत काँग्रेससह अन्य पक्षांमध्येही संभ्रम आहे. वंजारी यांना आगामी काळात पूर्व नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे की, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली म्हणून ते पूर्व नागपूर मतदारसंघात अधिक लक्ष घालत आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT