Nagpur Flood Compensation : अंशतः नव्हे सरसकट मदतीच्या मागणीवर सर्व आमदार ठाम !

District Collector assured : जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर हे प्रकरण थोडे थंड पडले.
Nagpur Flood
Nagpur FloodSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Flood Compensation News : मागील आठवड्यात शुक्रवारी नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यानंतर शहरात हाहाकार उडाला. शासकीय मालमत्तेसह लोकांच्या घरांचे, वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा केलेला दौराही वादात सापडला. (After the District Collector gave an assurance, the matter cooled down a bit)

नुकसानभरपाई देण्यावरूनही वादविवाद झाले. केवळ श्रीमंतांना नुकसानभरपाई देण्याकडे प्रशासनाचा कल आहे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर हे प्रकरण थोडे थंड पडले. आता मदत अंशतः द्यायची की सरसकट यावरून वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत.

नागपूर शहरात झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नुकसानीचा अंतिम आराखडा सोमवारपर्यंत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या वेळी अंशतः नव्हे तर सरसकट मदत देण्याची मागणी आमदारांनी केली.

शुक्रवारच्या (ता. २२) मध्यरात्री शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. पश्चिम नागपुरातील अनेक रस्ते वाहून गेले. नाग नदीवरचे पूलही तुटले आहेत. उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून यावर उपाययोजना करण्यासाठी काल (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, समीर मेघे, आशिष जायस्वाल, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, महानगरपालिकेचे उपायुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

बैठकीतील निर्देश व सूचना...

अंतिम आराखडा सोमवारपर्यंत सादर करा. नाल्याकाठचे अतिक्रमण तातडीने काढा. अघटित नुकसानाचे विशेष प्रस्ताव सादर करा. अंशतः नव्हे शक्यतो सरसकट मदत करा. दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात. क्षतिग्रस्त झालेल्यांना तातडीने मदत करा. नाल्यावरील अतिक्रमणे दूर करून पुनर्वसन करा. शासनामार्फतच अधिकृत फॉर्म भरण्यात यावे. खासगी फॉर्म संदर्भासाठी वापरावे. हिंगण्यातील नाल्यांवरील आच्छादने तातडीने लावा. तुटलेले पूल लवकर दुरुस्त करा. शेतमालाच्या नुकसानीचा सर्वे तातडीने पूर्ण करा. जानमालाच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या.

Edited By : Atul Mehere

Nagpur Flood
Nagpur Floods News : श्रीमंतांनाच मदत देताय, झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे काय? राष्ट्रवादी आक्रमक !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com