Hindi language imposition Maharashtra Sarkarnama
विदर्भ

Hindi language imposition : हिंदी सक्ती वादंगात, राजकीय धडपड; मनसे-भाजप पाठोपाठ काँग्रेसची वादात उडी

Nagpur Congress Opposes Hindi Language Imposition in Mahayuti's Education Policy : भाषावादाच्या भानगडीत न पडणाऱ्या काँग्रेसनेही हिंदी भाषा सक्तीच्या वादंगात उडी घेतली आहे.

Pradeep Pendhare, Rajesh Charpe

Maharashtra Hindi language row : राज्यात हिंदी आणि मराठी भाषेवरून मोठा वाद सुरू आहे. मनसे आणि उद्धव सेनेच्या विरोधानंतर हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

आता तिसरी भाषा म्हणून हिंदी लादल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. राज ठाकरे यांनी थेट धमकीवजा इशाराच दिला आहे. एरवी भाषावादाच्या भानगडीत न पडणाऱ्या काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे.

काँग्रेसने (Congress) हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपात इकडे नागपूरमध्ये महापालिकेचे शिक्षकांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. मराठी शाळेसाठी विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांना घरोघरी फिरावे लागत आहे. एका शिक्षकाला 10 ॲडमिशनचे टार्गेट देण्यात आले आहे. नोकरी टिकवण्यासाठी नाईलाजाने शिक्षकांना आता हे काम करावे लागत आहे.

नागपूर (Nagpur) विभागातील शाळा 23 जूनपासून सुरुवात होत आहे. दिवसेंदिवस महापालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. हे प्रमाण वाढतच चालले आहे. याच कारणामुळे काही शाळा व तुकड्या बंद कराव्या लागल्या आहेत. मागील वर्षी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 500ने घटली आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.

महापालिकेची शिक्षक दुहेरी संकटात आहे. त्यांना शाळाही टिकावायची आणि नोकरीसुद्धा. विद्यार्थ्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सध्या शिक्षकांची वस्त्यावस्त्यांमध्ये भटकंती सुरू आहे. नागपूर महापालिकेच्या 28 माध्यमिक आणि 86 प्राथमिक शाळा आहेत. मराठी विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली असल्याने यातील काही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहे.

नागपूरमध्ये मराठी आणि हिंदीचा वाद नाहीच. मराठी शाळांमध्ये शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी संख्येलाही हा वाद कारणीभूत नाही. एकूणच मध्यवर्गीयांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे सर्वच सरकारी शाळा ओस पडत चालल्या असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

मराठी सक्ती केली काय किंवा हिंदीची त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. मराठी भाषक पालकांनाच आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकायचे नाही. सर्वांचे प्राधान्य इंग्रजी शाळांना आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने राज ठाकरेंचे ऐकले काय किंवा नाही त्यामुळे काही फरक पडणार नाही असे महापालिकेच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT