
10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. टपाल विभागाच्या ‘पोस्टल लाइफ इन्श्युरन्स’ (Postal Life Insurance) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नसून, उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
पोस्टल लाइफ इन्श्युरन्स विभागात अभिकर्ता (Agent) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान १०वी उत्तीर्ण असावा. ही परीक्षा केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण केलेली असावी.
अनुभव: विमा क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वयोमर्यादा: अर्ज करणारा उमेदवार 18 ते 50 वयोगटातील असावा.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. ही मुलाखत दिनांक 1 जुलै 2025 रोजी होणार असून, इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे:
शैक्षणिक प्रमाणपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
उपनिदेशक (टपाल जीवन विमा विभाग), मुख्य कार्यालय, मुंबई – 400001
सरकारी क्षेत्रात चांगली नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेषतः 10वी पास उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी टपाल विमाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.