Pistol and Coyota Sarkarnama
विदर्भ

Nagpur Crime News : पुण्यात कोयता गॅंग तर नागपुरात ‘पिस्तुल राज’ची दहशत !

सरकारनामा ब्यूरो

10 pistols and a large quantity of cartridges were seized : पुणे जिल्ह्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. याची तक्रार नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. मागील अधिवेशनातही कोयता गॅंगचा मुद्दा गाजला होता. आता नागपुरात पिस्तुल बाळगणाऱ्यांची दहशत वाढली आहे. (The terror of those carrying pistols has increased in Nagpur)

गेल्या २० दिवसांत शहरातील परिमंडळ व पोलिस ठाण्यामधील पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत १० पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतूस जप्त करण्यात आले. त्यामुळे शहरात ‘पिस्तुल राज’ सुरू होत आहे की काय, असे वाटू लागले आहे.

शहरात क्राईम कंट्रोलसाठी पोलिस आयुक्तांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून गुन्हेगारांवर एनडीपीए आणि मोकाअंतर्गत कारवाई करीत अनेकांना कारागृह आणि शहराच्या हद्दीबाहेर ठेवण्याचा सपाटा त्यांनी लावला. त्यातून दोन वर्षांत मोठमोठ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यश आले.

विशेष म्हणजे, गुन्हेगार सुटल्यावरही त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी बीट मार्शलसह ठाण्यांना ‘टारगेट’देत कारवायांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. पण गेल्या महिन्याभरात शहरात पिस्तुल दाखवून लुटणे, धमकावणे आणि पिस्तुल बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी शहरातील २७ पिस्तुल धारकांचा परवाना रद्द करण्याचीही कारवाई करीत, वचक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

गेल्या १५ ते २० दिवसांत वेगवेगळ्या घटनांत १० पिस्तुल पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये एका युवकाकडून कळमन्यात पाच देशी आणि विदेशी बनावटीच्या पिस्तुल जप्त करण्यात आल्या. याशिवाय ३० मे रोजी दोन तर इतर तीन कारवायांमध्ये चार पिस्तुल जप्त केल्या. शहरात दीड ते दोन हजारांवर पिस्तुलधारक आहेत. पोलिस आयुक्तांनी त्यांपैकी २७ परवानाधारकांचे परवाने रद्द केले आहेत.

शौक, धाक आणि लुटमार..

युवकांमध्ये कट्ट्यांची क्रेझ आहे. त्यातून शौकासाठीही त्याचा वापर होताना दिसतो. उच्च वर्गातील युवकांद्वारे त्याचा इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर ‘रिल’साठी तर गुन्हेगारी प्रवृत्तीतील युवकांमध्ये खंडणी, धमकी आणि लुटमारीसाठी त्याचा वापर होताना दिसून येतो.

सहजरित्या येते शहरात..

देशीकट्टा वा पिस्तुल सहजरित्या नागपूर शहरात येते. उत्तरप्रदेश आणि बिहारमधून देशी कट्टा खरेदी करून तो रेल्वेमार्फत शहरात येतो. शहराच्या हद्दीत रेल्वे येताच, आऊटर भागात रेल्वे स्लो झाल्यावर युवक खुस्कीच्या मार्गाने ते शहरात आणतात.

सीमेवरील ठाणे संवेंदनशील..

शहराच्या (Nagpur) सीमेवर असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिकाअधिक पिस्तुलचा वापर होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, कामठी परिसरातील खदान, यशोधरानगर, कोराडी, एमआयडीसी, हिंगणा, गिट्टीखदान, कळमना या परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात देशीकट्टे असल्याचे आढळून आले आहे. पुणे (Pune) पोलिसांनी कोयता गॅंग तर नागपूर पोलिसांनी (Police) पिस्तुलवाल्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT