Santosh Jadhav
Santosh JadhavSarkarnama

Satara Crime News : माफी मागायला आले अन् कोयत्याने वार केले; साताऱ्यातील युवा नेता गंभीर

Crime News : पुणे, नाशिकनंतर साताऱ्यातही कोयत्याची दहशत
Published on

Satara Crime News : संगम माहुली (ता. सातारा) येथील युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री उशिरा घडली आहे. यात दोन जणांनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Marathi Latest News)

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून आले होते. यावेळी आरोपींनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव यांच्या डोक्याला जखम झाली आहे. नागरिकांनी जाधव यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Satara News)

Santosh Jadhav
Amol Kolhe's Fake PA: खासदार कोल्हेंच्या तोतया 'पीए'चा कारनामा; पोलिसांनाच घातला गंडा

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख (Satara Police) यांनी तातडीने संशयितांना पकडण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी माहुली परिसरातून काही मिनिटांतच दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.

Santosh Jadhav
Ganesh Sugar Factory : 'गणेश'च्या निवडणुकीत थोरात-कोल्हे, विखे, स्वाभिमानी मैदानात

काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली आहे. त्यानंतर नाशिकमध्येही कोयत्याने वार झाल्याच्या घटना घडल्या आहे. पुणे (Pune), नाशिकनंतर आता साताऱ्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com