Nagpur District Grampanchayat Election
Nagpur District Grampanchayat Election Sarkarnama
विदर्भ

Nagpur: नागपूर जिल्हा ग्रामपंचायत; भाजप समर्थीत ६, तर कॉंग्रेस समर्थीत सहांचा विजय..

Atul Mehere

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७८% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज मतमोजणी झालेली आहे. यामध्ये भाजप समर्थीत ६, काँग्रेस समर्थीत ६, शिवसेना उद्धव ठाकरे १, अपक्ष, १ आणि १ उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातल्या रामटेक (Ramtek) तालुक्यातील एक, कुही तालुक्यातील आठ आणि भिवापूर तालुक्यातील सहा अशा १५ ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat) रविवारी मतदान घेण्यात आले. या सर्व ठिकाणी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत भिवापूर तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींमध्ये ९६ उमेदवारांचे राजकीय भाग्य मशीन बंद झाले होते. रामटेक तहसील कार्यालयाच्या आवारात सध्या रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. कुही तालुक्यातील अंभोरा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस (Congress) समर्थीत राजू कुकडे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. भाजप (BJP) समर्थीत रामेश्वर बावनकुळे यांचा त्यांनी पराभव केला.

कुही तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत नंदा दाभाडदुभके विजयी भाजप समर्थीत तारा भोयर यांचा ९१ मतांनी पराभव झाला. भिवापूर तालुक्यातील गाडेघाट- घाटउमरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी विष्णू मंगर विजयी, तर पांजरेपार ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी आकांक्षा मानवटकर अवघ्या ४ मतांनी विजयी झाल्या. भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत विनोद गुडपूडे विजयी, तर कुही तालुक्यातील तारोली ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत सुरेखा राऊत विजयी झाल्या.

कुही तालुक्यातील नवेगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत विद्या चापले विजय झाल्या. फेगड ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत आशिष पाल विजयी झाले. तुडका ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत धनराज सहारे विजयी झाले. भिवापूर तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत योगेश तुमडाम सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत विजयी झाले. भिवापूर तालुक्यातील सावरगाव-नेरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी नलू गजभीये या अपक्ष गटाच्या विजयी झाल्या आहेत. रामटेकच्या टांगला ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत पंचकुला मडावी विजयी झाल्या. त्यांनी गोंडवाना पक्ष समर्थीत रेखा उईके यांचा पराभव केला. कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत राम येळकर विजयी झाले, तर गोन्हा ग्रामपंचायतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सीमा भोयर विजयी झाल्या आहेत. भिवापूर तालुक्यातील नागतरोली ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र गट म्हणून प्रकाश जांभूळे यांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT