नाशिक : राज्यातील बहुतांश ठिकाणी आज (ता.१९ सप्टेंबर) ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यातमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या 'स्वराज्य' संघटनेने ग्रामपंचायत निवडणुकीच आपलं खात उघडलं आहे. (Local Body Election Result)
महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या असून महाराष्ट्रातून स्वराज्य संघटनेचा हा पहिला विजय झाला आहे. हा विजय नाशिकच्या गणेश गावातून मिळाला असून रूपाली ठमके, असे महिला सरपंचांच नाव आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आले होते. (Chhatrapati Sambhajiraje Latest News )
स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आल्या होत्या. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे. शिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी रूपाली यांचे अभिनंदन केले असून स्वराज्य संघटनेचे नाशिक तालुक्यातील आणखी दोन सरपंच पदाचे उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. एकुण ३ सरपंच व २० च्यावर सदस्य निवडुन येणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते डॅा. धनंजय जाधव यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.