Khaparkheda Nagar Panchayat
Khaparkheda Nagar Panchayat Sarkarnama
विदर्भ

Nagpur District News : नगर पंचायतीला आमदार केदारांचा विरोध, खापरखेड्यात राजकारण तापले !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District's Khaparkheda-Chicholi Nagar Panchayat News : नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी दलित कार्ड खेळून पाच वर्षे सरपंच आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे सूतोवाच केले. यावर मागील अनेक वर्षांपासून राजकीय स्वार्थासाठी खापरखेडा (चिचोली) नगर पंचायतीला केदार विरोध करीत असल्याचा घणाघाती आरोप रिपाइंचे नेते पृथ्वीराज बोरकर यांनी केला. (MLA Sunil Kedar will fight against political leader)

यासंदर्भात नगर पंचायत कृती समितीच्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी केदारांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी चळवळ उभारली आहे. येणाऱ्या काळात सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध आमदार सुनील केदार सामना रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भात १७ मे रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.

पत्रकार परिषदेला पृथ्वीराज बोरकर, रमेश जैन, किशोर चौधरी, अशोक मेश्राम, प्रकाश लांजेवार, पृथ्वीराज बागडे, श्यामराव सरोदे, विलास महल्ले, राज तांडेकर, जयंत चव्हाण, राजेश गायकवाड, चंद्रशेखर पानतावणे, अनेस चवरे, नितीन गोस्वामी, रवी शेंडे, सुमेध चव्हाण, प्रशांत पाटील, राजकिरण शेंडे, मंगेश चोरपगार, अनिल छाणीकर, अनिल धनवटे, दिवाकर घेर, सुनील जालंदर, कपील वानखेडे, केशव पानतावणे, राजेश खंडारे, विनोद गोडबोले, शैलेश ढोरे, गिरधारी शर्मा आदी उपस्थित होते.

नुकत्याच खापरखेडा येथे झालेल्या आमदार सुनील केदार यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात आमदार सुनील केदार यांनी स्थानिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका हरल्यामुळे नगर पंचायतीचा मुद्दा उपस्थित केल्याचा घणाघात विरोधी पक्षावर केला. शिवाय दलित महिला सरपंच असल्यामुळे पदावरून कमी करण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता.

केदारांच्या आरोपावर उत्तर देताना पृथ्वीराज बोरकर यांनी सांगितले की, चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळवून देण्याची मागणी जवळपास ३० वर्ष जुनी आहे. यादरम्यान अनेक ठराव पारित करण्यात आले. मात्र सदर ठराव नागपूर जिल्हा परिषदेच्या पुढे सरकले नाहीत. चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायत नगर पंचायतीसाठी पात्र आहे.

चिचोली ग्रामपंचायतीपेक्षा कमी असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आमदार केदार नगर पंचायतीला विरोध करीत असल्याचाही आरोप बोरकर यांनी केला.

यावेळी नगर पंचायत कृती समितीचे नेते किशोर चौधरी व अशोक मेश्राम यांनी चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्यास त्यामागचे फायदे व नुकसान समजावून सांगितले. याप्रसंगी अशोक मेश्राम यांनी सांगितले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा पॉझिटिव्ह रिमार्क दिला आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना आमदार सुनील केदार नगर पंचायतीचा विरोध का करीत आहे, हे समजण्यापलीकडले असल्याचे सांगितले.

अनेकांनी आमदार सुनील केदारांच्या (Sunil Kedar) कृतीचा जोरदार विरोध केला. चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीची आवश्यकता का? याची जनजागृती जनतेमध्ये करणार असल्याचे किशोर चौधरी यांनी सांगितले. खापरखेडा परिसरात नगर पंचायतीचा मुद्दा चांगलाच तापला असून राजकीय नेत्यांमध्ये (Political Leaders) वाकयुद्ध बघायला मिळत आहे. येणाऱ्या काळात हा मुद्दा चिघळणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT