BJP leaders Pravin Datke and Sandeep Joshi have taken different positions on the Nagpur DJ ban, triggering a political dispute within the party. Sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP : 'डीजे'वरून भाजपमध्ये मतभेद! 'हिंदूंच्याच सणावेळी DJ बंदी का?' म्हणणाऱ्या आमदाराला माजी आमदार म्हणाले, "त्यांनी शेण खाल्ले म्हणून..."

Nagpur DJ Ban BJP Dispute : "पुढील दोन-तीन दिवसात दहीहंडीचे उत्सव, त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आहे. अशातच 3 सप्टेंबर रोजीच नागपूर पोलिसांना डीजेवर बंदीची आठवण का आली? ती 1 जानेवारीला किंवा इतर धर्मियांच्या सणांच्या वेळी पोलीस कुठे असतात?"

Jagdish Patil

Nagpur News, 04 Sep : सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण डीजेच्या मुद्द्यावरून चांगलंच तापलं आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात आवाज उठवल्यापासून हा मुद्दा खूप चर्चेत आला आहे. अशातच नागपुरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागपुरात डीजे बंदीचे आदेश जारी केलेत.

मात्र, पोलीस आयुक्तांच्या निर्णयावर भाजप आमदार प्रवीण दटके यांनी आक्षेप घेत, "फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळे डीजे बंदी का?" असा सवाल उपस्थित केला आहे. शिवाय "प्रशासनाने डीजे बंदी संदर्भात काढलेली अधिसूचना त्वरित मागे घ्यावी, आणि ती 1 जानेवारी 2027 पासून सरसकट सर्वांसाठी लागू करावी," अशी मागणीही दटके यांनी केली आहे.

पुढील दोन-तीन दिवसात दहीहंडीचे उत्सव, त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आहे. अशातच 3 सप्टेंबर रोजीच नागपूर पोलिसांना डीजेवर बंदीची आठवण का आली? ती 1 जानेवारीला किंवा इतर धर्मियांच्या सणांच्या वेळी पोलीस कुठे असतात? असा सवाल ही दटकेंनी उपस्थित केला.

मात्र, आता नागपुरातील भाजप नेत्यांमध्येच डीजेच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं समोर आलं आहे. कारण नागपुरात सर्वात आधी डीजे बंदीची मागणी माजी आमदार संदीप जोशी यांनीच केली होती. शिवाय पोलीस आयुक्तांनी डीजे बंदीचे आदेश जारी केल्यानंतर संदीप जोशी यांनी त्याचे स्वागतही केले होते.

तर डीजे बंदीवर त्यांच्याच लोकांनी घेतलेला आक्षेपावर त्यांना प्रश्न विचारला असता जोशी म्हणाले, 'त्यांनी शेण खाल्ले म्हणून मी पण शेण खाल्ले पाहिजे' ही भूमिका अयोग्य आहे, असं म्हणत जोशी यांनी आमदार प्रवीण दटकेंच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता नागपूर भाजपमधील नेत्यांचाच एकमेकांविरोधात डिजेच्या मुद्द्यावरून आवाज वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT