Nagpur News : नागपूरमध्ये एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या स्फोटामुळे संबंधित कंपनी क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. हा स्फोट झाला, त्यावेळी कामगार कंपनीच्या आत आणि कंपनीच्या प्रवेशद्वारावर उभे होते. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. स्फोट होण्यामागचे कारण समजलेले नाही.
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील डोरलीगावाजवळ असलेल्या एशियन फायरवर्क्समध्ये लिमिटेड कंपनीत हा स्फोट झाला आहे. ही कंपनी दारूगोळा बनवते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. स्फोटाचा आवाज एवढा होता की, संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. स्फोटाच्या आवाजामुळे अनेकांच्या कानठळ्या बसल्या होत्या.
स्फोटानंतर कंपनीत आगीचे लोळ सुरू होते. या आगीत काही कामगार होरपळ्याचे देखील समोर येत आहे. स्फोटाची माहिती मिळताच महापालिकेच्या (Municipal) अग्निशमन दलाने कंपनीकडे धाव घेतले. अग्निशमन दलातील सर्व कामगारांना कामावर हजर होण्याचा आदेश देण्यात आले होते.
या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांची उत्तरीय तपासणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील कंपनीत दाखल झाले होते. स्फोट नेमका कशामुळे झाले, याचा तपास पोलिसांंकडून केला जात आहे. मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंपनीबाहेर गर्दी केली होती.
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, काटोल आणि कळमेश्वर पोलिसांच्या पथकांसह घटनास्थळी पोचले होते. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख देखील स्फोट झालेल्या डोरलीगावात दाखल झाले होते.
कंपनीचं निवेदन...
प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेली आगीची दुर्घटना ही एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये घडलेली नाही, हे एशियल फायरवर्क्स कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. यात स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दुर्देवी स्फोट एशियन फायरवर्क्समध्ये झालेला. आमचे मॅन्यूफॅक्चरींग युनिट एशियल फायरवर्क्सपासून सुमारे 1.5 ते 2 किमी अंतरावर असलेल्या कोतवालबर्डी येथे असून या दुर्दैवी घटनेचा परिणाम झालेला नाही.
काही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये आमच्या कंपनीचा या घटनेशी चुकीचा संबंध जोडण्यात आला आहे. अशी कोणतीही चुकीची माहिती अथवा संदर्भ आपल्यापर्यंत आल्यास ते कृपया दुरूस्त करावे, अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. अशा संकटप्रसंगी, चुकीची माहिती प्रसारित करण्यापेक्षा आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांना पाठिंबा देणे आणि परिस्थिती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करणे, हे आपले प्राधान्य कर्तव्य आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि समाजाच्या सुरक्षा, पारदर्शकता आणि कल्याणासाठी वचनबद्ध आहोत,असंही कंपनीनं निवदेनात नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.