
Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मनात आलेली गोष्ट कोणतीही किंतु परंतु न ठेवता हे नेते सहजतेने बोलताना पाहायला मिळतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील रंगलेली जुगलबंद ही नेहमी चर्चेचा विषय बनते.
असंच काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या पक्षाचे दोन आमदार निवडून येण्याची शक्यता असताना त्यांचे चाळीस आमदार कसे निवडून आले, असा सवाल उपस्थित केला होता.
राज ठाकरे यांचं बोलणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चांगले जिव्हारी लागल्याचं समोर आला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे खवळलेल्या अजित पवारांच्या तावडीत पुण्यातील राज ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणार मनसेसैनिक बाबू वागस्कर सापडले. अजित पवारांनी त्यांच्यावर चांगलाच तिखट शब्दांचा मारा केल्याचे पाहायला मिळालं.
त्याच अस घडलं की, पुणे (Pune) महापालिकेचा 75 वा अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील विविध मंडळींनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्यासह पुणे शहरातील आजी-माजी पदाधिकारी आणि नेत्यांची उपस्थिती होती. उपस्थितीमध्ये पुण्यातील मनसेचे नेते बाबू वागस्कर देखील होते.
पुणे महापालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रम संपून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे शिवाजीनगर येथे होणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार होते. अजित पवार कार्यक्रम उरकून निघाल्या असताना त्यांची भेट बाबू वागस्कर यांच्याशी झाली. नंतर या दोन्ही नेत्यांमध्ये हस्तांदोलन झालं.
अजितदादांनी त्यावेळी "तुझा नेता (राज ठाकरे) तर जाहीरपणे बोलला की, आमच्या पक्षाला एक दोनच जागा मिळायला हव्या होत्या. हे बोलणं बरं नाही. सांगा त्यांना माझ्या भावना", असा शाब्दिक डोस देत दादांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनपेक्षितपणे अजितदादांचे शाब्दिक फटकारे ऐकावे लागल्याने बाबू वागस्कर हे देखील गोंधळून गेले, तर उपस्थितांमध्ये या संभाषणाची चांगली चर्चा रंगाची पाहायला मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.