Nagpur District's Saoner Pradhan Mantri Awas Yojana News : पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने कितीही सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यामध्ये अडचणी येतातच. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्येही घरकुलांचे बांधकाम निधीसाठी थांबले होते. ही बाब माजी नगरसेवक तुषार उमाटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगितली. त्यांनी लगेच संबंधितांना सूचना देऊन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. (Beneficiaries have to wait for funds in the construction phase)
कधी निधीसाठी, तर कधी वाळूसाठी घरकुलांचे बांधकाम रखडते. तेव्हा लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागतो. नितीन गडकरी जनतेच्या कामासाठी नेहमी तत्पर असतात. उपरोक्त विषयातही त्यांनी तीच तत्परता दाखवत. निधीसाठी रखडलेले घरकुलांच्या पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा केला.
नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना बांधकाम टप्प्यातील निधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अखेर माजी नगरसेवक तुषार उमाटे यांनी हे प्रकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घातले. गडकरींनी याची दखल घेत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
सावनेर शहर आवास योजनेच्या पहिल्या यादीत २०५ घरे मंजूर झाली. यांपैकी ९५ घरे पूर्ण झाली तर उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. पण, पुढील टप्प्यातील निधी मिळण्यासाठी लाभार्थी नगरपरिषदेकडे येतात. पण निधी उपलब्ध नसल्याने परत जावे लागते. माजी नगरसेवक तुषार उमाटे यांनी नितीन गडकरी यांना निवेदन दिले.
नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मनोज रानडे यांना सावनेर पालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पत्र पाठवून केल्या. त्यांनीही लगेच कार्यवाही करत निधी प्रस्तावित केला. आता लवकरच सावनेर नगरपरिषदेला घरकुलांचा निधी मिळेल आणि रखडलेले काम पूर्णत्वास जाईल, असे तुषार उमाटे म्हणाले.
देशातील पंतप्रधान (Prime Minister) आवास योजनेच्या माध्यमातून गोर-गरिबांना घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्राकडून (Central Government) राबवली जात आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेची गती मंदावली असल्याचा आरोप नेहमी केला जातो. घरकुलांची ही योजना चांगली आहे. पण अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने अडचणी येतात. या योजनेमध्ये अधिक सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.