Nitin Gadkari on Politics : माझं आयुष्य गेलं राजकारणात, आता तर समाजकारण करू द्या; असं का म्हणाले गडकरी?

Nagpur : याच माध्यमातून समाजकारणही करायचं असतं.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : देशात काय आणि राज्यात काय, सत्ताकारण, राजकारण आणि अर्थकारण नेहमीच चालतं. पण याच माध्यमातून समाजकारणही करायचं असतं आणि ते करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेमार्फत हेच काम पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (But we also want to do social work through this)

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेमार्फत २५, २६ व २७ ऑगस्ट, असे तीन दिवस चार सत्रांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी गडकरींनी आज (ता. २५) नागपुरातील (Nagpur) त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. गडकरींचे एक विशेष म्हणजे परिषद सुरू होण्यापूर्वीच ‘आज केवळ या विषयाशी संबंधित प्रश्‍न आपण विचारावे’, अशी सूचना गडकरी देतात.

गडकरींनी दिलेल्या सूचनेनंतरही काही पत्रकारांनी त्यांना एक-दोन राजकीय (Political) प्रश्‍न घेण्याची विनंती केली. त्यावर ‘राजकारण करता - करता तुमचंही आयुष्य गेलं आणि माझंही आयुष्य गेलं. आता तरी मला समाजकारण करू द्या आणि तुम्हीही या कार्यात हातभार लावा्', असे खेळीमेळीचे उत्तर देत त्यांनी पत्रकारांची विनंती फेटाळून लावली. अन् तेथे एकच हशा पिकला.

आज, शुक्रवारी (ता. २) दुपारी प्राथमिक उपचारावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता डॉ. राजीव पोतदार यांच्या ‘सामाजिक कार्यकर्ता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उद्या (ता. २६) दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान शिक्षक आणि पर्यवेक्षकांचे अनुभव कथन होणार आहे. तर सायंकाळी ६.३० वाजता वनवासी कल्याण आश्रम युवा आयामचे प्रमुख मोहन नारायण गिरी यांचे व्याख्यान होणार आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari News : मुलांना मोबाईलच्या विळख्यातून काढण्यासाठी नितीन गडकरींनी केला ‘हा’ उपाय !

रविवारी (ता. २७) दुपारी तीन वाजता अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पिठाचे पिठाधिश्र्वर जितेंद्र नाथ महाराजांचे आर्शीवचन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com