Nagpur Graduate Election | Abhijit Vanjari | Congress Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : नागपूरची जागा जिंकली, पण काँग्रेस नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू : 'त्या' फोटोवरून ठाकरेंनी सुनावलं

Nagpur Graduate Election : सध्या नागपूर काँग्रेसमधील दोन गटांमध्ये अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या श्रेयावरून लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विकास ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा विजय झाला, यात आम्हाला आनंद असल्याचेही विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Jagdish Patil

Nagpur News, 01 Nov : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीला काँग्रेसची पिछाडी आणि आघाडी अशी चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीदरम्यान निकालाबाबत उत्सुकता असतानाच अखेर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. या विजयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता या विजयाचे श्रेय घेण्यावरून नागपूर काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.

अभिजित वंजारी निवडून आल्यानंतर प्रचाराच्या काळात फारसे सक्रिय नसलेले काँग्रेसचे स्थानिक नेते आता विजयाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. फोटो काढून त्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीसाठी कोणी मेहनत घेतली, हे स्वतः अभिजित वंजारी यांना माहीत आहे, असा टोला काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी फोटोसेशन करणाऱ्या नेत्यांना लगावला.

सध्या नागपूर काँग्रेसमधील दोन गटांमध्ये अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या श्रेयावरून लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विकास ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा विजय झाला, यात आम्हाला आनंद असल्याचेही विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अभिजित वंजारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारत असतानाच्या फोटोत सुनील केदार उपस्थित होते. सुनील केदार यांच्या समर्थकांकडून या फोटोचे भांडवल केले जात आहे. नागपूर जिल्ह्यात केदार यांचीच हवा असल्याचा संदेश दिल्लीपर्यंत देण्याचे काम या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा आहे.

यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच सुनील केदार यांचे नाव न घेता प्रचारात गायब असलेले नेते आता विजय झाल्यानंतर प्रकटले आहेत, अशी टीका विकास ठाकरे यांनी केली. त्यामुळे अभिजित वंजारी यांच्या विजयानंतर सुरू झालेला नागपूर काँग्रेसमधील श्रेयवाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT