Abhijeet Vanjari Vs Sudhakar Kohale  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election Results: ..अखेर भीती खरी ठरली; नागपूर पदवीधर भाजपनं गमावला; काँग्रेसनं खातं उघडलं; वंजारींनी बाजी पलटवली; कोहळेंना पराभवाचा धक्का

MLC Election 2026 : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभवाचा मोठा धक्का देत काँग्रेसनं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत अखेर खातं उघडलं आहे. अभिजीत वंजारींनी अक्षरश:भाजपच्या कोहळेंकडून विजय खेचून आणला आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News: अखेरच्या टप्प्यांत नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या गोटात पसरलेली भीती खरी ठरली.विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभवाचा मोठा धक्का देत काँग्रेसनं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत अखेर खातं उघडलं आहे. अभिजीत वंजारींनी अक्षरश:भाजपच्या कोहळेंकडून विजय खेचून आणला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपनं नागपूर पदवीधर निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत भाजप उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

मात्र,अखेरच्या टप्प्यांत भाजपच्या कोहळेंच्या चार हजार सातशे मतांचं लीड तोडत अभिजीत वंजारींनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभव कोहळे यांनी मान्य केला असल्याचं समोर येत आहे.बुधवारी रात्री अखेर काँग्रेसच्या वंजारींनी नागपूर पदवीधर राखण्यात यश मिळवलं आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या पाच जागांपैकी आता महाविकास आघाडीला नागपूर,पुणे आणि मराठवाडा पदवीधर अशा तीन ठिकाणी विजय मिळाला आहे.तर महायुतीला पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जिंकण्यात यश आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्येच विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची प्रचंड दमछाक झाली आहे. तरीही भाजपला नागपूर पदवीधरचा गड राखता आला नाही. कोहळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजप तसेच त्यांच्या समर्थकांकडून विजयी जल्लोषाची तयारीही सुरू करण्यात आली होती.

नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यांत कोहळेंची 4 हजार मतांची आघाडी कमी होऊन ती 1200 झाली. त्यानंतर अभिजीत वंजारींनी दहा हजारांची मतमोजणी बाकी असतानाच 2400 मतांची निर्णायक आघाडीही घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मतमोजणी दरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT