MLC Election : महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यांना जमला नाही, तो 'प्रताप' सख्या भावांनी करुन दाखवला; 'पदवीधर'मध्ये उधळला गुलाल, तिसऱ्या जोडीची विधिमंडळात एन्ट्री

Aurangabad Graduates Constituency MLC election News : विधिमंडळात एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आमदारांची भलीमोठी यादीच आहे. त्यात कुणी कुणाचे बहिण-भाऊ तर कुणी चुलते-पुतणे, मावसभाऊ, मामा-भाचे, वडिल-मुलगा किंवा साडू अशा जोड्याच आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी पार पडली. यामध्ये पुणे, नागपूर व औरंगाबाद या तीन पदवीधर मतदारसंघातील तर पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीनंतर विधिमंडळात चार नवे चेहरे जाणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळात एकमेंकाचे जवळचे नातेवाईक असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये आता आणखी एक सख्या भावांची तिसरी जोडी विधिमंडळात जाणार आहे. परभणीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचे मोठे भाऊ प्रताप पाटील हे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आणखी एक भावाची जोडी सभागृहात दिसणार आहे.

विधानपरिषदेत एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आमदारांची भलीमोठी यादीच आहे. त्यात कुणी कुणाचे बहिण-भाऊ तर कुणी चुलते-पुतणे, मावसभाऊ, मामा-भाचे, वडिल-मुलगा किंवा साडू अशा जोड्याच आहेत. यातील काहींचा पक्ष एकच आहे. तर काहीजण विरोधी पक्षात आणि काही जण सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे यापूर्वीच विधिमंडळात राणे, सामंत बंधू एकत्र काम करीत आहेत. त्यामध्ये दोघे जण राज्य मंत्रीमंडळात मंत्री देखील आहेत. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेकडून विजयी झालेले उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे सख्ये बंधू किरण सामंत हे देखील शिवसेनेकडून विजयी झाले आहेत. या दोन भावांची जोडी विधानसभेत आहे. विशेष म्हणजे दोघेही शिवसेनेचे आमदार आहेत. उदय सामंत रत्नागिरी, तर किरण सामंत राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Uddhav Thackeray
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

त्याशिवाय आणखी एक भावाची जोडी ही कोकणातूनच निवडून आलेली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव आमदार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे हे भाजपकडून (BJP) आमदार आहेत तर कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे शिवसेनेकडून आमदार आहेत. त्यामध्ये नितेश राणे मंत्रिमंडळात मत्स्य उद्योग मंत्री आहेत.

Uddhav Thackeray
Shiv Sena UBT : ठाकरे गटाला मोठा दिलासा! दीपक सावंत यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

सख्खे बहिण-भाऊही सभागृहात

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आणि कन्या दोघेही विधानसभेत आहेत. जालन्यातील भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे भाजपकडून निवडून आलेले आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. तर संतोष दानवे यांची बहीण संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत.

दोन मावसभावांच्या जोड्याही विधानसभेत

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत तर त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आले आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून दोनदा निवडून आले आहेत. त्यांचे सख्ये मावसभाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आहेत.

Uddhav Thackeray
BMC Budget : सर्वात श्रीमंत महापालिका, बजेटचा आकडे ऐकूण बसले धक्का; 'ही' राज्य आसपासही नाहीत!

त्याशिवाय मराठवाड्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून परभणी मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे दोघेजण मावसभाऊ आहेत. दोघेजणही विधानसभेत आहेत.

चुलत-बहीण भाऊ विधिमंडळात

भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्या पर्यावरण मंत्री आहेत तर त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे हे चुलत भावंडं हे विधिमंडळात आहेत. विशेष म्हणजे २०१४ व २०१९ मध्ये दोघांनी परळी मतदारसंघातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. दोघेही एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्यानंतर एकदा पराभूत झाले तर एकदा विजयी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com