Nagpur, 10 September : मुलाच्या ऑडी मोटारीने चार ते पाच गाड्यांना धडक दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियावरून हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. विरोधकही तुटून पडले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे मित्र मद्यप्राशन करून होते. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी संकेत बावनकुळे याची वैद्यकीय चाचणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र भरधाव गाडी घेऊन जात होते. मध्यरात्री एकच्या सुमारास नागपूर (Nagpur) शहरातील रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंटजवळ बावनकुळे याच्या ऑडी गाडीने तीन ते चार गाड्यांना धडक दिली. त्यानंतर मानकापूर पुलाजवळ आणखी एक कारला ऑडीने धडक दिली. यातून मोठा राडा झाला आहे.
धडक बसलेल्या मोटारीमधील युवकांनी संकेत बावनकुळे याच्या मित्रांना मारहाण केली. त्यांना पोलिसांच्या हवाली केले होते. हे प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनासुद्धा माध्यमांसमोर यावे लागले होते.
ऑडी गाडी आपल्या मुलाच्या नावावर असल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र, संकेत हा गाडी चालवत नव्हता. पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. पोलिसांनी संकेत बावकुळेचे मित्र अर्जुन हावरे आणि रोहित चिंतलवार या दोघांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ते मद्यप्राशन करून असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी मात्र संकेत बावनकुळे याची वैद्यकीय तपासणी केली नाही. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता तो आरोपी नसल्याचे त्यांनी सांगितले. संकेत बावनकुळे हा गाडीत बसून होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्याची ऑडी गाडी जप्त करण्यात आली आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.