Shivsena News : शिवसेनेच्या सर्व्हेत नागपूर मध्यला पसंती, आग्रह मात्र दक्षिणसाठी

Political News : शिवसेनेने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत मध्य नागपूरला पसंती देण्यात आली असली तरी पदाधिकाऱ्यांचा आग्रह मात्र दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आहे. आता नेते सर्व्हेला प्राधन्य देतात की पदाधिकऱ्यांचा आग्रह राखतात यावरच सर्व काही अवलंबून आहे.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील दोनच विधानसभा मतदारसंघात शिवसेना लढणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीणमध्ये रामटेक मतदारसंघाला शिवसेनेची पहिली पसंती आहे. शहरात मात्र मोठा पेच आहे. सेनेने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत मध्य नागपूरला पसंती देण्यात आली असली तरी पदाधिकाऱ्यांचा आग्रह मात्र दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आहे.

आता नेते सर्व्हेला प्राधन्य देतात की पदाधिकऱ्यांचा आग्रह राखतात यावरच सर्व काही अवलंबून आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत नागपूरला आले असता त्यांनी दोनच मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघावर दोन जिल्हाध्यक्ष आणि दोन शहराध्यक्ष यांनी दावा केला आहे. जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया आणि शहर प्रमुख नितीन तिवारी आणि दीपक कापसे हेसुद्धा येथे दावेदार आहेत. (Shivsena News)

विशेष म्हणजे यापैकी कोणाचेच आपसात पटत नाही. यापैकी कोणा एकाला तिकटी दिली तरी नाराजी अटळ आहे. भाजपसोबत (Bjp) युतीत असताना दक्षिण नागपूरमध्ये आतापर्यंत तीन वेळा शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यापूर्वी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेना लढली. प्रवीण बरडे, ज्ञानेश्वर वाकुडकर आणि शेखर सावरबांधे पूर्व मधून लढले होते. बरडे आणि सावरबांधे हे विजयाच्या समीप पोहचले होते. मात्र, त्यांनी विजयात रुपांतर करता आले नाही.

आता पूर्व नागपूरचे समीकरण बदलले आहे. भाजपचे येथे जबरदस्त वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, तीन वेळा विधानसभा लढूनही शिवसेनेला दक्षिण नागपूरमध्ये आपला दबदबा निर्माण करता आला नाही.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Hingoli Assembly Election : हिंगोली विधानसभा निवडणुकीत काय होणार? उत्सुकता शिगेला...

महाविकास आघाडी असल्याने यावेळी शिवसेनेला फायदा होणार असला तरी काँग्रेस येथे दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या पाच हजाराच्या मताधिक्याने येथून पराभूत झाले होते. हे बघता काँग्रेस दक्षिण नागपूर सोडले असे वाटत नाही.

महाविकास आघाडीचा विचार करता मध्य नागपूर जास्त फायद्याचा राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. सुमारे साडेतीन लाखांचा हा मतदारसंघ आहे. यात 70 हजार मुस्लिम, 22 हजार दलित आणि 90 हजार हलबा असे सुमारे पावणे दोन लाख मतदार आघाडीसाठी जमेची बाजू आहे. हलबा समाज सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहे. मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांना आता स्वीकारले आहे. शिवसेनेच्या पक्षांतर्गत सर्व्हेत मध्य नागपूरलाच पसंती दर्शवली आहे. जाहीरपणे त्यांनी हे बोलून दाखवले आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Manoj Jarange News : विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या 'या' तीन बड्या नेत्यांनी घेतली जरांगेंची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com