Honey Trap Sarkarnama
विदर्भ

Nagpur Honeytrap Case : नागपुरातील आणखी काही पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर !

White Collar People : या टोळीचा हा पहिलाच प्रताप नाही तर यापूर्वीही त्यांनी अनेकांना फसवले असावे.

Atul Mehere

Nagpur Honeytrap Case : गडचिरोलीतील एक शासकीय अभियंता नागपूरला कामानिमित्त गेला असताना हॉटेलमध्ये महिलेच्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’ करून त्याला १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात एक पत्रकार, एक पोलिस शिपाई आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असून यात आता आणखी काही पत्रकार आणि इतर लोक पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनील गवई (पोलिस), रविकांत कांबळे (पत्रकार), रोहित अहीर व ईशानी यांना पोलिसांनी २९ जानेवारी रोजी नागपुरातून अटक केली. चौघांनाही न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील एक महिला फरार असून तिचा शोध सुरू आहे. यामध्ये इतरही कुणी पत्रकार आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहे. प्रकरणाच्या विविध अंगांनी पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे आणखी कोण ते पत्रकार आणि छायाचित्रकार, अशी चर्चा नागपूरच्या पत्रकारिता वर्तुळात सुरू झाली आहे. पण हा छायाचित्रकार पत्रकारिता जगतातील नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा हा पहिलाच प्रताप नाही तर यापूर्वीही त्यांनी अनेकांना फसवले असावे. यामध्ये काही उच्च पदस्थ अधिकारी आणि काही व्हाईट कॉलर मंडळी या टोळीच्या जाळ्यात फसली असावी, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. येवढेच नव्हे तर आणखी काही पत्रकार आणि पोलिस कर्मचारी या टोळीत असावे, असाही संशय आहे. सर्व आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत. त्यातून काही घबाड उघडकीस येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

साहाय्यक अभियंत्याला दहा लाखांची खंडणी मागितल्यानंतर अभियंत्याने गडचिरोली पोलिसांत धाव घेतली होती. या प्रकरणी तपास करून पोलिसांनी जे सत्य उजागर केले त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, सदर अभियंता नागपुरात गेल्यानंतर पोलिस शिपाई सुशील गवई याने त्यांच्यासाठी हॉटेलमधील एक रुम बुक केली होती.

त्या खोलीत दोन महिलाही थांबल्या होत्या. मात्र सकाळ होताच महिलांनी अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला. प्रकरणातून वाचवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकीही दिली. याचवेळी अभियंत्याचा मित्र असलेल्या गवई यांनी या प्रकरणात रविकांत कांबळे याला दोन ते तीन लाख रुपये दिल्याचे नाटक केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींनी काही दिवसांनंतर तुम्ही बलात्कार केल्यामुळे महिला ही गर्भवती असल्याचे सांगितले. सोबतच बलात्काराचा गुन्हा दाखल करून सार्वजनिक बदनामी करण्याची धमकी दिली. हे संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी अभियंत्याकडून दहा लाख रुपयांची मागणी केली. अचानकपणे घडलेल्या या घटनाक्रमाने संबंधित अभियंता हा पुरता घाबरला. मात्र त्याने हिंमत दाखवत झालेल्या या प्रकाराची तक्रार गडचिरोली पोलिसांत दाखल केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT