Gadchiroli Congress VS BJP : दत्तक गावाकडेही ढुंकुंन बघत नाहीत, मतदारसंघातील जनतेला हे काय न्याय देणार ?

MP Ashok Nete : महेंद्र बाम्हणवाडे यांनी खासदार नेतेंच्या दाव्याची हवाच काढली.,
Ashok Nete and Mahendra Brahmanwade
Ashok Nete and Mahendra BrahmanwadeSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli Congress VS BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदारांना त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील एक गाव दत्तक घेउन त्याला माॅडेल बनविण्याच्या सुचना दिल्या होत्या. मागास, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांनी औपचारिकता म्हणून गाव दत्तक घेतले तर खरे, पण आता ते गावाकडे ढुंकुनही बघत नाहीत.

या गावात विकासाचा पत्ताच नाही. आता तर येथील लोक चांगलेच संतापले आहेत. निवडणुकीत भाजप 'चार सौ'चा नारा देत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रतिनीधींना विकासाचे काही देणे घेणे नाही, असा टोला लगावत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी खासदार अशोक नेते यांच्या दाव्याची हवाच काढली.

Ashok Nete and Mahendra Brahmanwade
Gadchiroli : फडणवीसांनी व्यक्त केले मुख्यमंत्र्यांचे आभार; नेमके कारण कळले का?

अशोक नेते हे गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. पण सामान्य जनतेत त्यांच्याबद्दल रोष आहे. पंतप्रधान नरेद्र मोंदींनी आपल्या भागातील एक गाव दत्तक घेऊन त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. त्या गावाचा असा विकास करावा की, इतरांसाठी तो रोल माॅडेल होईल, अशा सुचना देशातील खासदारांना दिल्या होत्या.

अशोक नेते यांनी येवली हे गाव दत्तक घेतले. येवली हे गाव गडचिरोलीपासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील गाव खासदारांनी दत्तक घेतल्याने या गावाचा मोठा विकास होईल, अशी अपेक्षा येवलीवासियांना होती. पण ती पुरती फोल ठरली आहे. गावात पाहिजे तसा कुठलाच विकास झाला नाही.

गावात अभ्यासिका नाही ना इतर महत्वाच्या सुविधा. खासदारांनी रोजगाराचे आश्वासन दिले होते. पण गावात बेरोजगारांची मोठी फौज आहे. गाव दत्तक घेऊन सांगितले अन् खासदार नेते नेतेगिरी करून मोकळे झाले. दत्तक घेतलेल्या गावाला भेट देण्याचे साधे सौजन्यही खासदार नेते दाखवित नसल्याचे सांगत महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नेतेंना चांगलेच धारेवर धरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली जिल्हयातील मुख्यालयापासून जवळच असलेल्या गावात जर विकासाचा पत्ता नसेल तर दुर्गम भागात हे महाशय काय तिर मारत असतील? पंतप्रधानांनी ज्या विश्वासाने खासदारांना गाव दत्तक घ्यायला सांगून विकासाबाबत भुमिका घेतली. तेच आता त्यांच्या विश्वासघात करत असल्याचा घणाघात यावेळी ब्राम्हणवाडे यांनी केला.

एकीकडे सुरजागड मेटलच्या माध्यमातून जिल्हयातील अनेकांना रोजगार दिल्याचा 'ढिंढोरा' खासदार अशोक नेते हे वारंवार पिटत आहेत. पण त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या गावाकडे ते ढुंकूनही बघत नसतील, तर याला काय म्हणावे, हा प्रश्न यानिमीत्ताने आता विचारला जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com