Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Nagpur Lok Sabha Constituency : ‘ते’ आमच्याकडे आले आहेत, आता ते चांगले राहतील; गडकरींना विश्‍वास !

Nitin Gadkari : भाजपला पक्षाचा विस्तार करायचा आहे. ५१ टक्के मते मिळवण्याचे भाजपने उद्दिष्ट्य ठेवले आहे. तेव्हा सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Lok Sabha Constituency : ज्या राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. त्यानंतर त्यांच्यावरील सर्व आरोप धुऊन निघाले. त्यावरून भाजप ही ‘वॉशिंग मशीन’ आहे, अशीही टीका विरोधक करतात. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना विचारले असता, ते लोक आमच्याकडे आले आहेत, आता ते चांगले राहतील, असे गडकरी विनोदाने म्हणाले.

गडकरी यांनी आज (ता. 22) ‘सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. व्ही.सी.च्या माध्यमातून सकाळच्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप होता, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप होता, असे परस्पर विरोधी विचारधारेचे लोक आणि पक्षांसोबत भाजपने तडजोडी करून महायुतीत सामावून घेतले, यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले, भाजपला पक्षाचा विस्तार करायचा आहे. ५१ टक्के मते मिळवण्याचे भाजपने उद्दिष्ट ठेवले आहे. तेव्हा सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप देशात चारशे, महाराष्ट्रात चाळीसपेक्षा अधिक आणि आपण नागपूरमधून पाच लाख मताधिक्‍यांनी जिंकून येणार असल्याचे केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले. या वेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी हेच होणार असल्याचा दावाही केला. दक्षिण भारतात भाजपला आजवर फारसे यश मिळाले नाही., याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले, कर्नाटकमध्ये या वेळी अपेक्षित जागा भाजप जिंकणार आहे. तेलंगणात चार जागा वाढतील आणि आंध्र प्रदेशात आमचीही युती आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पूर्वी या वेळी जास्त जागा जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे.

निवडणूक लढण्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी भरपूर पैसा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. सर्वच पक्षांना निधीची गरज असते. याकरिता निवडणूक रोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून काही वाद व मतभेद असतील तर सर्वांनी सनदशीर मार्गाने यावर तोडगा काढावा. बऱ्याच देशात निवडणूक लढण्यासाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो, असे गडकरी यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT