Nitin Gadkari : संघ मुख्यालयात नितीन गडकरींचा दबदबा ; अकोल्यात मात्र भाजप विरोधात घराणेशाहीची ओरड !

Akola Politics : अकोल्यात वंचित चे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात भाजपने तरुण उमेदवार अनुप धोत्रे यांना तिकिट दिले आहे. अकोल्यात नुकतेच केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आले होते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं व काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या या मतदार संघात सभा होतील. अकोला राष्ट्रीय राजकारणात अग्रेसर असेल. तेव्हा घराणेशाहीवरुन धोत्रे विरोधात आंबेडकर हा संघर्ष पाहता येईल.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : भाजप ने नितीन गडकरी यांच्या नावाची नागपूर लोकसभा मतदार संघासाठी घोषणा आज केली. महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाली. आज ची घोषणा ही व्यापक अर्थाने मोठी मानली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथून गडकरी यांची उमेदवारी हा राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दोन दिवस आधी गडकरींच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. संघाची तीन दिवसीय प्रतिनिधी सभा 15 ते 17 मार्च दरम्यान नागपूर येथे होत आहे. यात राष्ट्रीय स्तरावरचे पंधराशे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. राष्ट्रीय मुद्यांवर या प्रतिनिधी सभेत विचारमंथन होणार असल्याने तत्पुर्वी नितीन गडकरी यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे.

नितीन गडकरी हे संघाच्या अतिशय जवळचे असा नावालौकीक त्यांचा आहे. गडकरी यांनी केंद्रिय मंत्री म्हणून देश भरात केलेले उत्तुंग कार्य सत्तापक्षाबरोबर विरोधकांच्या प्रशंसेचे नेहमीच कारण ठरले आहे. नितीन गडकरी राजकीय दृष्ट्या अजातशत्रु नेता असल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल नागपूरकरांच्या मनात शंका नव्हती. गडकरींनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे उमेदवारीबद्दल आभार मानले आहे. खासदार म्हणून दहा वर्षाच्या निरंतर सेवेनंतर नागपूरकरांच्या प्रेम आणि समर्थनाच्या जोरावर पुन्हा नागपूरचा विकासाचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari
Nanded Loksabha Election News : भाजपला चिखलीकरांचीच गॅरंटी, आता अशोक चव्हाणांची परीक्षा...

वर्धा लोकसभा रामदास तडस यांचे नावाची घोषणा करत भाजपने पुन्हा रामदास तडसांना संधी देत इतर दिग्गज नेत्यांना नाकारले आहे. रामदास तडस यांच्यासोबत पक्षात माजी खासदार सुरेश वाघमारे, डाॅ.रामदास आंबटकर, राजेश बकाने यांनी देखील तिकिट मागितले होते. पण, पक्षाने रामदास तडस यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनयन बजाज, वसंत साठे या नेत्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. त्या मतदार संघावर देवळी येथील रामदास तडस यांची पकड घट्ट झाली आहे.

चंद्रपूर मतदार संघात थेट सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देत भाजपने हंसराज अहिर यांना धक्का दिला आहे. चंद्रपूर या एकाच ठिकाणी २०१९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. गेल्या वेळी काही विधानसभा मतदार संघात हंसराज अहिर यांना भाजप मतदारांनी धोका दिल्याचा आरोप होता. यंदा मात्र भाजपने हंसराज अहिर यांचे तिकिट रिपिट केले नाही थेट सुधीर मुनगंटीवार यांना तिकिट देत लोकसभा लढण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. राज्यात विविध उपक्रम घेणे, अर्थमंत्री,वन मंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची यशस्वी कारकिर्द आहे. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी देत भाजपने काँग्रेस च्या ताब्यातील एकमेव जागा पुन्हा परत घेण्याची तयारी सुरु केली आहे. नव्या संसदेच्या दारांसाठी वापरलेले लाकूड मला खुणवत असल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर राष्ट्रकार्यासाठी आपण अग्रेसर राहू, असा विश्वास त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर व्यक्त केला.

रावेर हा मतदार संघ तसा विदर्भात येत नाही पण, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके या मतदार संघात येतात. रक्षा खडसे यांना पुन्हा तिकिट भाजपने दिले आहे. या ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या भानगडीत भाजप पडले नाही. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात गेले. नाथाभाऊंची मुलगी अॅड.रोहिणी खडसे या राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असताना भाजप ने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देत खडसे परिवारातच रावेर मतदार संघ ठेवण्याचा निश्चिय केल्याचे चित्र आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात कोण उमेदवार रिंगणात येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सोशल मिडियावर भाजप च्या घराणेशाहीवर अकोल्यात सडकून टिका होत आहे. परिवार या शब्दावरुन विरोधकांना घेरणाऱ्या भाजप ने अकोल्यात घराणेशाही कायम ठेवल्याचा आरोप सोशल मिडियावरुन होताना दिसत आहे. सामान्य नागरिक थेट या घराणेशाहीवर व्यक्त होत आहे. गेल्या तीन- चार वर्षापासून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे दूर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे ते लोकसभेत उपस्थित राहू शकले नाही. असे असताना अकोल्यात संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजप ने तिकिट देत भाजप च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. यात भरीसभर म्हणून वंचितचे राज्य उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी भाजप व अकोलेकरांचे दूर्देव म्हणत अनुप धोत्रे यांना तिकिट दिल्याचा आरोप केला आहे. भाजपला आता घराणेशाही च्या विरोधात ब्र सुध्दा उच्चारण्याचा हक्क राहिला नाही. असे म्हणत अनुप धोत्रे यांचे तिकिट हे घराणेशाहीचे उत्तम उदाहरण असल्याचे पुंडकर म्हणाले. 'परिवार' या शब्दावरुन इतर पक्षांवर टिका करणाऱ्या भाजपची नैतिकता आता कुठे गेली ? असा प्रश्न या निमित्त विचारण्यात येत आहे. घराणेशाहीच्या मुद्यावर अनुप धोत्रे यांना घेरले जात असले तरी जातीय समीकरण, महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी आणि इतर राजकीय परिस्थिती पाहता आंबेडकर यांच्यासाठी ही निवडणुक सोपी नसेल. आंबेडकर यांच्या पराभवासाठी भाजप नेत्यांनी देखील कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदार संघात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप संघटनेच्या आधारावर आपण जिंकू असा विश्वास अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari
Muralidhar Mohol : लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत मोहोळ का ठरले सरस?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com