Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election: फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंकडं उमेदवारांची रांग! आता निष्ठावंत निवडण्याची जबाबदारी विशेष समितीवर

Nagpur Mahapalika Election 2025: नागपूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असून अनेक वर्षे तिथे भाजपची सत्ता आहे. पण तरीही यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे इच्छुकांचा मोठा ओढा असल्याचे चित्र आहे.

Rajesh Charpe

Nagpur Mahapalika Election 2025: नागपूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असून अनेक वर्षे तिथे भाजपची सत्ता आहे. पण तरीही यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे इच्छुकांचा मोठा ओढा असल्याचे चित्र आहे. त्यातच आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्षाच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. उमेदवारांची पडताळणी केली जात आहे. उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने याकरिता अनुभवी आणि निष्ठावंतांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आजघडीला 457 इच्छुकांनी उद्धव ठाकरे सेनेकडे उमेदवारी मागितली आहे. यातून निष्ठावंत कोण? हे निवडण्याचे अवघड काम समितीला करावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे सेनेने स्थापन केलेल्या निष्ठावंतांच्या समितीमध्ये नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे, जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, सुरेश साखरे, सागर डबरासे, गंगाधर नाकाडे, नितीन तिवारी, प्रवीण बरडे, किशोर पराते, जयसिंग भोसले, अंजुषा बोधनकर, सुरेख खोब्रागडे, सुशीला नायक, मंगला गवरे, सुरेखा गाडे, मीना अडकणे, महेंद्र कठाणे, दिलीप तुपकर, किशोर ठाकरे, नितीन सोळंके, गुलाब भोयर, संदीप रियाल पटेल, राजेश कनोजिया यांचा समावेश आहे.

या समितीला उमेदवार निवडण्यासोबतच प्रचार दौरे व सभांचे नियोजन, जनमताचा आढावा घ्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये शिवसैनिक विभागले गेले आहेत. उद्धव ठाकरे सेनेत कायम राहिलेल्यांना निष्ठावान तर शिंदे सेनेत असलेल्यांना गद्दार म्हटले जाते. आता निष्ठावंतांच्यावतीने नागपूर महापालिकेचे एकत्रित लढण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा दावा केला जात आहे.

मागील निवडणुकीत शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले होते. यात स्वतः जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांचा समावेश आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांनी स्वबळावर लढली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या घटली. असे असले तरी भाजप आणि काँग्रेस या दोन बलाढ्य असलेल्या पक्षाच्या विरोधात दीड डझन उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मतविभाजन झाले नसते तर एकतर शिवसेना किंवा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. नेमकी ही बाब हेरून आघाडी झाल्यास उद्धव सेनेच्यावतीने किमान 35 जागा द्यावा अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT