Political activity intensifies in Nagpur as Congress announces its decision to contest the mayor election against BJP, turning an expected unopposed poll into a direct contest. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Mayor Election : 5 नगरसेवक वाढताच काँग्रेसचा धक्कादायक निर्णय; भाजपसाठी बिनविरोध वाटणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूरात सध्या बहुमतात असल्याने भाजप महापौर कोणाला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे भाजपने गुरुवारी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलली. फक्त महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे एवढीच प्रक्रिया शिल्लक राहिली असली तरी भाजपला निवडणुकीला सामोरे जावेच लागणार आहे. काँग्रेसकडे महापौर निवडून येण्याइतके संख्याबळ नसले तरी ते आपला उमेदवार उभा करणार आहे.

येत्या 6 फेब्रुवारी रोजी सकाळ 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून. 151 सदस्यीय नागपूर महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 102 नगरसेवक निवडून आले आहेत. 2017 च्या तुलनेत सहा जागांची घट झाली असली, तरी सत्ता राखण्यात भाजपला यश आले आहे.

काँग्रेसचे यंदा 34 नगरसेवक निवडून आले असून, त्यांची संख्या पाचने वाढली आहे. याशिवाय एमआयएमचे 6, इंडियन मुस्लिम लीगचे 4, शिवसेना (उबाठा) 2, तर बसपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणूक निकालानंतर महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांची नावे शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली आहे.

मनपा प्रशासनाने महापौर निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठवल्यानंतर विभागीय आयुक्तांनी 6 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली असून, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास निवडणूक लढतीची ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून महापौर व उपमहापौर पदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर म्हणाले, आमचे संख्याबळ कमी असले तरी महापौर व उपमहापौर निवडणूक लढवणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी उमेदवार देण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT