Chief Minister Devendra Fadnavis as BJP debates potential women mayor candidates for Nagpur Municipal Corporation. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Mayor : मुख्यमंत्री कार्यालयातील 'सल्लागार' नागपूरच्या महापौर होणार? भाजपच्या आधी काँग्रेस नेत्यानेच जाहीर केले नाव

Nagpur Mayor : नागपूर महानगरपालिकेत भाजपने 102 जागा जिंकल्याने महापौर भाजपचाच होणार हे निश्चित असून शिवाणी दाणी, नीता ठाकरे, अश्विनी जिचकार आणि दिव्या धुरडे या चार महिलांची नावे चर्चेत आहेत.

Rajesh Charpe

नागपूर : महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. मात्र सोडत निघाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आरक्षणानुसार विदर्भातील चार पैकी अमरावती वगळता तीन महापालिकेच्या महापौर महिला होणार आहेत.

यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील संभाव्य महापौर कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. इथे भाजपने 102 जागा जिंकल्याने महापौर हा भाजपचाच होणार हे निश्चित आहे. यानंतर सध्या शिवाणी दाणी, नीता ठाकरे, अश्विनी जिचकार आणि दिव्या धुरडे या चार महिलांची नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

शिवाणी दाणी यांचे नाव आघाडीवर :

शिवानी दाणी या भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. यापूर्वी त्या शहराच्या अध्यक्ष होत्या. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्व्हेस्टर ॲडव्हायजर म्हणून त्यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती केली आहे. मागील काही वर्षांपासून त्या राज्याच्या अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक व्याख्याने घेतात.

तसेच मुख्यमंत्र्यांच्याच दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महापौर आरक्षणाची सोडत सुरु असतानाच नागपूरचे महापौरपद जर खुला महिला प्रवर्गासाठी राखीव झाले तर ही सोडत फिक्स आहे, असा आरोप करत शिवाणी दाणी यांचे नाव जाहीर केले होते.

अन्य 3 नावेही चर्चेत :

नगरसेविका अश्विनी जिचकार यांचेही नाव समोर येऊ शकतो. त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्याही दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून विजयी झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून यापूर्वी संदीप जोशी आणि नंदा जिचकार यांना महापौरापदाच मान देण्यात आला होता. त्यामुळे अश्विनी जिचकार आणि शिवाणी दाणी या दोघींपैकी कोणाचेही नाव दिले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच मतदारसंघात महापौर पद जाण्याची शक्यता आहे.

नीता ठाकरे या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 10 वर्षांपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. मागील निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता त्या पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांचासुद्धा महापौर पदावर राहणार आहे. दिव्या धुरडे या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून सलग 4 वेळा निवडून आल्या आहेत. मागील कार्यकाळात भाजपने त्यांना महापालिकेच्या प्रतोद करून त्यांचे नाव आघाडीवर आणले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT