Devendra fadnavis, ravindra chavan  Sarkarnama
विदर्भ

Nagpur MLC election: विधानपरिषदेचा धुरळा : नागपूर 'स्थानिक' मतदारसंघात भाजपचा आमदार फिक्स; काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी अन् शिवसेना बहुमताच्या आसपासही नाही!

Nagpur local body constituency News : गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने जवळपास 17 जागा रिक्त होत्या. त्यातच आता भाजपचा गड असलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 मतदारसंघात निवडणूक होत आहे. 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडल्याने विधानपरिषद निवडणूक होऊ शकली नव्हती. मागील 6 महिन्यात 20 जिल्हा परिषद वगळता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

या 17 पैकी एक जागा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचीही आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये विधानसभेवर निवडून गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. आता या जागेवर निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपचा एकतर्फी विजय निश्चित मानला जातोय. यापूर्वी 2015 आणि 2022 मध्ये झालेल्या निवडणुकाही भाजपने सहज खिशात घातल्या होत्या.

२०२२ मधील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत गाजली होती. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ऐनवेळी भाजपमधून (BJP)आलेल्या छोटू भोयर यांना तिकीट दिले. मात्र, नंतर काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा विजय मिळवून भाजपचे या मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले होते.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता एकूण मतदार ८९६ आहेत. त्यामध्ये भाजप ५२०, शिवसेना ३०, राष्ट्रवादी काँग्रेस ९ असे महायुतीचे एकूण ५५९ सदस्य आहेत. तर काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष १९, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ११ असे महाविकास आघाडीचे एकूण २०० सदस्य आहेत तर इतर ६७ जण आहेत.

या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश प्रतिनिधी डॉ. राजीव पोतदार, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर अनिल सोले, दयाशंकर तिवारी, संघनात्मक प्रमुख किशोर रेवतकर, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची नावे चर्चेत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर, उद्योजक अरुण लखानी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अरुण लाखनी हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नातलग आहेत.

तर कॉँग्रेसकडून राजेंद्र मुळक, गिरीश पांडव आणि किशोर कन्हेरे यांची नावे चर्चेत आहे. पण नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार केवळ औपचारिकता म्हणूनच उभा राहण्याची शक्यता आहे. आता काळात या निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT