MlC Election : विधानपरिषदेचा धुराळा : सोलापूर 'स्थानिक'चा बिगुल वाजणार; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या गडावर भाजपची मजबूत पकड

Local Body Election Maharashtra News : पहिल्या टप्यात पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुका पार पडताच आता राज्यातील 17 जागा पैकी जवळपास पाच ठिकाणच्या निवडणुका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Devendra fadnavis, ravindra chavan
Devendra fadnavis, ravindra chavan Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राज्यात काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्याने विधानपरिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक देखील होऊ शकल्या नव्हत्या. यात मागील बऱ्याच वर्षांपासून सोलापूर मतदारसंघाचीही जागा रिक्त आहे. आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या रिक्त जागेवर भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने याठिकाणी त्यांच्या कोट्यातून येत्या काळात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर अपवाद वगळता आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. २००४-२०१० च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून दिलीपराव माने विजयी झाले होते. २०१०-२०१६ या कालावधीत राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांचे वर्चस्व होते. २०१६ च्या निवडणुकीत मात्र सोलापूरचे राजकीय समीकरण बदलले. भाजपकडून प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे यांचा पराभव करत हा गड भाजपकडे खेचून आणला.

बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपने (BJP) येथे विजय मिळवत वर्चस्व ठेवले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात उमेदवार कोण असणार यावरून उत्सुकता लागली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. या जागेसाठी माजी आमदार प्रशांत पारिचारक पुन्हा इच्छुक आहेत. याशिवाय विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते नव्याने भाजपमध्ये आलेले राजन पाटील, दिलीप माने यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
VidhanParishd Election: विधानपरिषदेचा धुराळा : परभणी-हिंगोलीतील 'स्थानिक'च्या गणितात राष्ट्रवादी वरचढ; एकनाथ शिंदेंपुढे जागा टिकवण्याचे आव्हान

सोलापूर जिल्ह्यातून या निवडणुकीसाठी एकूण ५०१ सदस्य मतदान करणार आहेत. त्यामध्ये महायुतीमधील भाजप २६२, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७१, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ४७ असे महायुतीचे एकूण ३८० सदस्य आहेत. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना २७, काँग्रेस १९, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३४ असे एकूण ७० संख्याबळ आहे. त्याशिवाय अपक्ष ४ तर स्थानिक आघाडीचे ४७ सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. विशेषतः भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने भाजप इतर पक्षांना जागा सोडण्याची संधी कमी आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Maharashtra MLC election : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! भाजपच्या एका निर्णयाने समीकरण बदलणार, दिल्लीतून पुन्हा राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्र ?

सोलापूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात

सोलापूर जिल्हा परिषदेत ६८ सदस्य असून या ठिकाणी भाजपला बहुमत आहे. भाजप ३८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ११, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ५, शिवसेना एकनाथ शिंदे 8, शेकाप 3, करमाळा स्थानिक आघाडी 2, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1 असे पक्षीय बलाबल आहे. तर पंचायत समितीच्या ११ सभापतींना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असणार आहे. त्यामुळे ११ पैकी १० सभापती हे भाजपचे आहेत तर एक सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

सोलापूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व

सोलापूर महापालिकेत एकूण १०२ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ८७, एमआयएम ८, एकनाथ शिंदे शिवसेना ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे याठिकाणी देखील भाजपचे प्राबल्य आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'! एका जागेसाठी 'या' नावांची जोरदार चर्चा; राष्ट्रवादीतून कोणाला आमदारकीची लॉटरी?

जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल

सोलापूर जिल्ह्यात माढा, माळशिरस, अनगर, श्रीपूर-महाळुंग, वैराग आणि नातेपुते या एकूण ६ ठिकाणी नगरपंचायती कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यात ११ ठिकाणी नगरपरिषदा कार्यरत आहेत, ज्यामध्ये बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुर्डुवाडी, अकलूज आणि मोहोळ यांचा समावेश आहे.

या ठिकाणचे पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहे :

सोलापूर जिल्हयात ११ नगरपालिका व ६ नगरपंचायती असून याठिकाणी एकूण सदस्य संख्या ३४९ इतकी आहे. त्यामध्ये पक्षानुसार भाजप १३७, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५९, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३४ असे एकत्रित महायुतीचे २३० इतके संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना २७, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २९, काँग्रेस १७ असे एकत्रित आघाडीचे संख्याबळ ७३ इतके आहे. त्याशिवाय स्थानिक आघाडीचे ४२ तर अपक्षांची संख्या ४ इतकी आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Bjp News : जयदत्त क्षीरसागर पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; नाशिकमार्गे विधान परिषदेची स्वप्नं; बीडमध्ये चर्चांना उधाण

जयकुमार गोरेंचे मत ठरणार निर्णायक :

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यावर भाजपचे एकहाती वर्चस्व ठेवण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांनी स्थानिकच्या निवडणुकीपूर्वीच स्वपक्षातील नेतेमंडळींचा विरोध पत्करून विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये संधी देत निवडणुकीपूर्वीच साखर पेरणी केली होती.

माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीवाना प्रवेश देत डाव टाकला होता. त्यामुळे स्थानिकाच्या निवडणुकीवर भाजपचे एकहाती वर्चस्व पाहवयास मिळाले. त्यामुळे भाजपचा विधान परिषदेचा उमेदवार ठरवताना पालकमंत्री गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com