Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ती केव्हा होईल याची सध्या कोणालाच खात्री देता येत नाही. सर्व काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र महापालिकेचे प्रशासन आणि प्रशासक यांनी मात्र महापालिकेचे बजेट सादर करताना निवडणुकीची काळजी घेतली असल्याचे दिसून येते.
महापालिका आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांचे ५ हजार ४३८.६१ कोटी रुपयांचे प्रस्तावित बजेट सादर केले. हे करीत असताना मतदार नाराज होणार नाही याची काळजी घेऊन त्यांनी मालमत्ता करात कुठलीच दरवाढ केलेली नाही. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने गेल्या बजेटमधील तब्बल ६९८.८७ कोटी रुपये खर्चच केलेले नाहीत. ही रक्कम नव्या बजेटमध्ये समाविष्ट करून प्रारंभीची शिल्लक म्हणून दाखवण्यात आली आहे.
महापालिकेच्या (Nagpur Corporation) तिजोरित भर घालण्यासाठी आयुक्तांनी शहरातील अधिकाधिक मालमत्ता कराच्या जाळ्याखाली आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठेवणीतील उत्तर दिले. सध्या मालमत्तांचे जीएसआय मॅपिंग केले जात आहे. त्यातून नव्या व जुन्या मालमत्ता निदर्शनस येत आहेत. सर्व डाटा गोळा करून त्यांना मालमत्ता कर निर्धारण कक्षात आणले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात ११०६३ नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्या आहेत. त्यातून ४ कोटी ५२ लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मालमत्ता कराचे देयके पाठवण्यासाठी डाक विभागाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे सर्वांना देयके मिळू लागली आहेत. काही पत्ते चुकीचे असल्याने ते दुरुस्त केले जात आहेत. याशिवाय मालमत्ताधारकांना एसएमएस आणि व्हॉट्सॲपवर इंग्रजी आणि मराठी भाषेतून देयके पाठवण्यात येत आहेत. ग्रीन बिल्डिंग बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात १० टक्के सुट देण्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेला ३५० कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आयुक्त चौधरी यांनी व्यक्त केली.
यापुढे सवलत मिळणार नाही
मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे तीन वर्षांपासून सवलत देणारी अभय योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत थकबाकीवरून दंड माफ केला जात आहे. यानंतरही अनेक जण कराची रक्कम भरत नाहीत. ही योजना राबवण्यासाठी लोकप्रितिनिधींचा दबाब असतो असे समोर आले आहे. याबाबत विचारणा केली असता आयुक्त म्हणाले, ही योजना वारंवार राबवणे चुकीचे आहे. यापुढे ती राबवली जाणार नाही. वारंवार संधी देऊनही अनेक जण थकबाकी भरत नाहीत. त्यामुळे शास्तीला काही अर्थ राहात नाही.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.