Nagpur mahapalika.jpg Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election : नागपूर महापालिकेची प्रभाग रचना झाली लिफाफा बंद; नगरसेवकांच्या हरकतींचे काय होणार ?

Municipal Corporation News: आगामी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर नोंदवण्यात आलेल्या हरकती व आक्षेपांवर सुनावणी आटोपली.

Rajesh Charpe

Nagpur News: आगामी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर नोंदवण्यात आलेल्या हरकती व आक्षेपांवर सुनावणी आटोपली. राज्य शासनाने नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम प्रभाग रचनेचा (Ward) विकास आराखडा आता नगर रचना विभागाकडे सादर केला आहे.

यात काय बदल केले आणि कोणाच्या सूचनांचा विचार करण्यात आला आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात आला हे आता अंतिम रचना जाहीर झाल्यावरच उघड होणार आहे. त्यामुळे आता सर्व इच्छुकांचे लक्ष अंतिम प्रभाग रचना केव्हा जाहीर होते याकडे लागले आहे.

मनपाने 23 ऑगस्टला जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 115 हरकती व सूचना आल्या होत्या. या आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गत 9 सप्टेंबरला सुनावणी घेतली.

विशेष म्हणजे हर्डीकर काही काळ नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. सुनावणीच्यायावेळी माजी नगरसेवक, इच्छुकांनी सुधारणा करण्याच्या मागणीवर हर्डीकर यांनी सकारात्मकताही दाखविली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाला आवश्‍यक त्या सुधारणा करण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन हर्डीकर यांनी अंतिम केलेली प्रभागरचना मनपा आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आली आहे. आता नगरविकास विभागाकडून हा अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभाग 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोग अंतिम मान्यता देत मान्यता दिलेली प्रभाग रचना आयोगाकडून मनपाला येईल.

त्यानंतर नागपूर मनपा आयुक्त 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान अधिसूचनेद्वारा ही अंतिम झालेली प्रभागरचना प्रसिद्ध करेल. भाजपचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे आणि माजी स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांनी त्यांच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले होते. कुकडे यांच्या प्रभागात महापालिकेच्या दुसऱ्याच झोन वस्तींचा समावेश करण्यात आला होता.

यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. झलके यांनी शहराच्या हद्दीत नसलेल्या ग्रामीणचा काही भाग प्रभागाला जोडला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यावर हर्डीकर यांनी महापालिका प्रशासनाला खुलासा करण्यास सांगितले होते. हे बघता या दोन माजी नगरसेवकांच्या आक्षेपानुसार प्रभाग रचनेत बदल होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT