Ajit pawar Controversy : IPS अंजना कृष्णा प्रकरणामुळे अडचणीत,अजितदादांनी बावनकुळेंसमोरच बाहेर काढली सगळी खदखद

IPS Anjana Krishna News : सोलापूरमधील एका गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून पेटलेला वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर अजितदादांनी घटनास्थळी असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी मोबाईलवरती झालेला संवाद व्हायरल झाला आहे. यावरुनच त्यांच्यावर टीका देखील होत आहे.
Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सोलापूरमधील एका गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून वाद निर्माण झाला आणि तो वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचला त्यानंतर अजित पवार यांनी घटनास्थळी असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधला हा मोबाईल वरती झालेला संवाद व्हायरल झाला आणि अजित पवारांवर टीका देखील झाली. त्यानंतर आता राज्य सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कार्यक्रमांमध्ये भाष्य केले.

पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, हा कार्यक्रम 4 वाजता होता, पण आम्ही थोडे उशिरा आलो. गाडीतून उतरल्या उतरल्या बावनकुळेसाहेबांनी नुसतं माझ्याकडे पाहून घड्याळ दाखवलं.

मी म्हटलं, काय करता बाबा. आता झालाय उशीर. पण बावनकुळेसाहेब (Chandrashekhar Bawankule), मी एकटा कार्यक्रमाला येणार असतो तर राईट टाईमवर आलो असतो. पण प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्रीसाहेब ज्यावेळेस हेलिकॉप्टर चालू होती, त्यावेळेस आम्हाला तिथं बसावं लागतं. त्याच्यामुळे आमची पंचाईत होती, नाहीतर मी बरोबर चार वाजता आलो असतो. आता तुम्ही त्यामध्ये काय ओळखायचं, ते ओळखा आता मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले , सकाळी मी बीडमध्ये मुख्यमंत्र्यांचं बीडचा पालकमंत्री म्हणून स्वागत केलं. आता मी पुण्यामध्ये आहे ते आपल्या पुण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं आताही स्वागत करतो.

Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
BJP President News: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अचानक महाराष्ट्रातून 'हे' मोठं नाव आलं चर्चेत; 'RSS' आपली 'ती' इच्छा पूर्ण करणार?

बावनकुळेसाहेबांनी आत्ता बोलताना सांगितलं की, पानंद रस्त्याला मुरूम काढला तर रॉयल्टी लागणार नाही. पुणे शहरांचे पोलीस आयुक्त, तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात. सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, पानंद रस्त्यावर जर मुरूम टाकला तिथं बंदी नाही परवानगी आहे.

Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
CJI Bhushan Gavai News : काही शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका, म्हणजे योग्य संदेश जाईल! सरन्यायाधीश गवईंची सुनावणीदरम्यान नाराजी

आणि ते सोलापूरला पण कळवा... बावनकुळेसाहेब गेल्या महिन्यात हे सुरु केल असतं, तर काय वाईट झालं असतं ओ. कशाला मला त्रास झाला असता, कारण नसताना नको त्या गोष्टीचा गवगवा होतो. शेवटी लोकशाही आहे, घटना आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार दिला आहे, त्यानुसार आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मी जास्त खोलात जात नाही. अजित पवार यांनी हा विषय आवरता घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com