BJP vs NCP in Nagpur Sarkarnama
विदर्भ

BJP vs NCP in Nagpur : नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या 40 जागांवरील दाव्यानं भाजप संतापली; राजू जैन म्हणाले, 'आमची ताकद बघा...'

Nagpur Civic Polls Ajit Pawar NCP Claims 40 Seats BJP Turns Aggressive : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस जागांवर दावा केला आहे.

Rajesh Charpe

Mahayuti alliance tension : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस जागांवर दावा केला आहे. एकही नगरसेवक नसता एवढ्या जागा कशा मागता, असा सवाल भाजपने केला आहे. याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर विभागाचे निरीक्षक आणि माजी आमदार राजू जैन यांनी आज दिले.

'आमचे काम बघा, वाढलेल सदस्य बघा, आतापासूनच आमच्याकडे महापालिका निवडणूक लढण्यासाठी अर्ज येऊ लागले आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीकडे केलेला 40 जागांचा दावा योग्यच असे, त्यांनी स्पष्ट केले'.

जागा वाटपाचा निर्णय स्थानिक पातळीवर होत नाही. महायुतीच्या (Mahayuti) तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची बोलणी करतील. त्यानंतर ती जाहीर केली जाईल. त्यावेळी जे काही ठरले ते तेव्हा बघू,आज आम्ही आमच्या पक्षाच्या तयारीला लागलो आहोत. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद वाढत चालला आहे. विदर्भाकडे आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. आज राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या तुलनेत अधिक बळकट झाली असल्याचा दावाही यावेळी जैन यांनी केला.

तत्पूर्वी नागपूरचे (Nagpur) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत 40 जागा देण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली होती. यापेक्षा कमी जागा दिल्यास आम्ही स्वबळावर लढू, असा इशाराही देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचा नागपूरमध्ये मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा विभागीय मेळावा येत्या शुक्रवारी (ता.23) सदर परिसरातील परवाना भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार राजू कारेमोरे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार अमोल मिटकरी, मनोज कायंदे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

'NCP' मंत्र्यांची उपस्थिती

आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची तयारी, पक्षाचे धोरण आणि भूमिकेविषयी या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी एक मेळावा घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार असल्याचेही राजू जैन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT