Congress news Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : पटोले, वडेट्टीवार यांच्यासमोरच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राडा...

Mangesh Mahale

Nagpur : नागपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आज चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच दोन्ही गट भिडले. प्रदेशाध्यक्षांसमोरच एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत हाणामारी झाली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या वेळी व्यासपीठावर होते. भाषण करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे समजते.

नागपूर येथे काँग्रेसची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माईकवर भाषण करण्यावरून वाद झाला. वादानंतर पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन गटात हाणामारी झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे हा प्रकार झाल्याचे समजते.

नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात शाब्दीक वादावादी झाली. यावेळी व्यासपीठावर पटोले, वडेट्टीवार उपस्थित होते. दोन्ही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT