Shivsena Dasara Melava : दसऱ्याला ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरूनच धडाडणार; BMC कडून शिक्कामोर्तब

Maharashtra Politics : शिंदे गटानेही या मैदानासाठी अर्ज केला होता.
Dasara Melava latest news
Dasara Melava latest newssarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बीएमसीने ठाकरे गटाला काही नियम-अटींवर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास परवानगी दिली आहे.

मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी ठाकरे गटाने महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर शिंदे गटानेही या मैदानासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दोन दिवसांपूर्वी मागे घेण्यात आला आहे.

आज (गुरुवारी) बीएमसीने ठाकरे गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी मेळाव्यासाठी दोन्ही गटाने अर्ज केल्याने वाद झाला होता. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयात सुनावणी होऊन ठाकरे गटाला शिवाजी पार्क मिळाले होते. असाच वाद यंदाही होतो की काय अशी चर्चा होती, पण बीएमसीच्या परवानगीमुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यात ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dasara Melava latest news
Somnath Zende News : चर्चेतील दोन पीएसआय झेंडे, एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार शोभराजला पकडणारे, तर दुसरे...

ठाकरे गटाचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 'दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे,' असे दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. दसऱ्याच्या दिवशी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येतात. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com