Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Congress News : काँग्रेसचं जागावाटप कधी? विजय वडेट्टीवारांनी थेट तारीखच सांगितली

Vijay Wadettiwar On Congress Seat Sharing : "मध्य प्रदेशात अर्थ खात्याने लाडकी बहीण योजना चालू शकत नाही असे सांगून चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीने लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजनाही बंद होणार."

Rajesh Charpe

Nagpur News, 02 Oct : विधानसभेची निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पित्रुपक्षसुद्धा संपला असल्याने आता सर्वांचे लक्ष उमेदवारीकडे लागले आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा जागा वाटपाचा मुहूर्तच सांगून टाकला आहे.

आठ, नऊ आणि दहा ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या सलग बैठका आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले, जागा वाटपात आम्ही खुप पुढे गेलो आहोत.

नवरात्रीमध्ये अधिकाधिक उमेदवारांची नावे आम्ही घोषित करणार आहोत. बऱ्याच जागांवर एकमत झालं आहे. काही थोड्या थोड्या जागांवर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्वच पक्षांचे दावे आहेत. त्यासाठी आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान मॅरेथॉन बैठका घेऊन वाद निकाली काढले जातील.

38 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विषय कुठून आला हे माहिती नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा विषयच उपस्थित होत नाही. आम्ही सर्व जागा महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच ओबीसी आरक्षणाचे आंदोलन लक्ष्मण हाके आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलने, उपोषणे करणारे जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

हाकेंना समोर करून ओबीसी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात महायुतीचे सरकार असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आम्हाला भूमिका जाहीर करायला सांगत आहेत.

जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन कुठल्या मुद्यावर मागे घेतले हे त्यांनी सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राला घोटाळे करणारे महायुतीचे सरकार नको आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना सत्ता तर दूर राज्यात फिरणेही अवघड होणार असल्याचंही टीका त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कधी कधी सत्य बोलतात. मध्य प्रदेशात अर्थ खात्याने लाडकी बहीण योजना चालू शकत नाही असे सांगून चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीने लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजनाही बंद होणार असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT