VIDEO : तोंडाला लगाम नाहीच! अजितदादांचा समर्थक आमदार महिलांविषयी बरळला

Devendra Bhuyar News : नोकरीवाला, पानटपरी आणि किराणावाला, शेतकरी; अशी विभागणी देवेंद्र भुयार यांनी केली आहे. त्यांना कशा मुली मिळतील, याबद्दल भुयार यांनी भाष्य केलं आहे.
devendra bhuyar.jpg
devendra bhuyar.jpgsarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठिंबा देणारे मोर्शी-वरूड आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. चांगल्या मुली फक्त नोकरदारांना मिळतात, असं वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं आहे. भुयार यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

नोकरीवाला, पानटपरी आणि किराणावाला, शेतकरी; अशी विभागणी देवेंद्र भुयार यांनी केली आहे. त्यांना कशा मुली मिळतील, याबद्दल भुयार यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे भुयार ( Devendra Bhuyar ) यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

भुयार यांनी काय म्हटलं?

देवेंद्र भुयार म्हणाले, "चांगली मुलगी तुमच्या-माझ्यासारख्याला नाही, तर नोकरीवाल्याला भेटते. दोननंबरची काळी-सावळी मुलगी पानटपरी आणि किराणा दुकानदाराला मिळते. तीन नंबरचा राहिलेला गाळ शेतकऱ्याच्या मुलाला भेटतो. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काय खरे राहिले नाही."

"जन्माला येणारा मुलगा हेबाळ निघते. माय इल्लू, पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू, असाच सगळा कार्यक्रम आहे," असं भुयार यांनी म्हटलं आहे.

devendra bhuyar.jpg
Siddharam Mhetre VIDEO : जाळून टाकेल! काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंनी अधिकाऱ्याला धमकावलं

शेतकऱ्यांची टिंगल उडवण्याचा प्रकार...

शिवसेनेच्या नेत्या ( ठाकरे गट ) सुषमा अंधारे यांनी देवेंद्र भुयार यांचा समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, "देवेंद्र भुयार यांच्यासारख्यांचा वाह्यातपणा हा फक्त महिलांचा अवमान करणार नाही. पण, शेतकऱ्यांची टिंगल उडवण्याचा हा प्रकार आहे. कृषी क्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणे, कृषी क्षेत्राला कमी लेखणे, कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांची अवहेलना करणे, असा हा प्रकार घडलेला आहे."

"महायुतीच्या नेत्यांनी काहीही वाह्यातपणा केला, कितीही हीन पातळीची वक्तव्ये केली, तर आपल्यावर कायद्याचा बडगा उगरला जाणार नाही, असं अभय त्यांना मिळालं आहे," अशी टीका अंधारे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com