RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi,
RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi,  Sarkarnama
विदर्भ

RSS राजकारणात उतरणार का, मोहन भागवतांनी स्पष्टचं सांगितलं..

सरकारनामा ब्युरो

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस (RSS ) कायम चर्चेत राहीला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भाजपची मातृसंघटना मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपर्यंत अनेक ज्येष्ठ नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. (Mohan Bhagwat news update)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरणार का? असा सवाल अनेक वेळा विचारण्यात येतो, याला सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी उत्तर दिले आहे. ते काल (मंगळवारी) विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, "देश सक्षम झाला पाहिजे हेच संघाचे प्रयत्न राहिले आहेत. याच विचारातून 97 वर्षांपूर्वी संघ सुरू झाला होता. एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही. परंतु, सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात,"

"आपल्या देशासमोर असलेल्या आव्हानाचा सामना एकाच नेत्याला करायचा नाही. तो नेता किती ही मोठा असला तरी तो एकटा सर्व आव्हानांचा सामना करू शकत नाही. 1857 पासूनच देशाच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी अनेक लोकं उभे राहिले, अनेकांनी बलिदान दिले, अनेकांचे आयुष्य खर्ची गेले. लोकांच्या जीवनाची झालेली बरबादी, लोकांनी केलेले समर्पण हे व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले," असे मोहन भागवत म्हणाले.

"संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे ही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत. मात्र, संघ तसे करणार नाही, म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही.कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते,"

"स्टेटस आणि कन्फर्ट" या दोन गोष्टी कोणत्याही संघटनेसाठी आपत्ती ठरते. स्टेटसला प्रेम करणारा नेता आणि कन्फर्ट ला प्रधान्य देणारे कार्यकर्तेच संघटनेचा बट्ट्याबोळ करतात," असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT