नागपूर येथील संघ मुख्यालयातून आसामचे सरकार चालविले जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी थेट आरएसएसचे नाव न घेता ‘नागपूर येथून’, असे म्हणत तेथून आसाम सरकार चालविले जात असल्याचा आरोप केला. भाजप आणि आरएसएस हे देशात द्वेषाचे, तिरस्काराचे राजकारण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपुर जळले, मणिपूरचे गाव, लोक जाळले. गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर येथे आले नाही, असा दावा करत आज (ता. २४) राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत त्यांच्या जमीन, सुपारी बिझनेसवर जोरदार प्रहार केला.
राहुल गांधी यांनी आसामच्या बारपेटा येथे भाजप आणि आरएसएसवर जोरदार टिका करत आसामचे सरकार आसामच्या लोकांद्वारे चालविल्या जात नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. आसामचे सरकार नागपूर येथून चालविले जात असल्याचे सांगितले. आरएसएस प्रचारक वापरत आसामी दुप्पटा हातात घेत राहुल गांधी यांनी हा दुप्पटा आसामचा स्वाभिमान असल्याचे सांगितले.
दुपट्ट्याचा अपमान आरएमएस व भाजप करत असल्याचा दावा गांधी यांचा होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि गृहमंत्री अमित शाह हे या दुपट्ट्याचा अपमान करत आहेत. आसामची भाषा, संस्कृती आणि इतिहास भाजपला पुसायचा आहे. त्यासाठी नागपूर येथून हालचाली होतात. ते काँग्रेस होऊ देणार नाही. आसाममध्ये आसामच्या लोकांचे सरकार असावे. यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे गांधी म्हणाले.
आसाम चे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भ्रष्टाचारी असून त्याचे किस्से आणि भ्रष्टाचाराची यादीच राहुल गांधी यांनी वाचून दाखविली. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात द्वेष भावना आहे. माझा त्यांना विरोध नसून त्यांच्या मनातील द्वेष भावनेला विरोध असल्याचे गांधी म्हणाले. मुख्यमंत्री जमीन चोर असल्याचा आरोप करत सुपारीच्या बिझनेसला गांधी यांनी वाचा फोडली. तर कांझीरंगा मध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जमीन खरेदी केल्याचा दावा गांधी यांनी केला. तुम्ही पान खाल्ले तरी त्यात वापरली जाणारी सुपारी ही हिमंता बिस्वा सरमा यांची असते. त्यामुळे त्याचा पैसा थेट हिमंता सरमा याच्या खिशात जातो, असा दावा गांधी यांनी केला. भाजप आणि आरएसएस जात, धर्म, भाषा आणि प्रदेश या आधारावर लोकांना विभाजित करत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझ्यावर किती पण केसेस लावा मी घाबरणार नाही. मी भाजप, आरएसएसला भीत नाही. अदाणीच्या विरोधात बोललो म्हणून माझ्यावर केस लावली. लोकसभा सदस्यत्व रद्द केले. मला दिलेल्या सरकारी घरातून काढले. पण, मी हिंदुस्थानातील प्रत्येकाच्या मनात आहे. लोकांच्या मनात माझे घर आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकार व आरएसएसवर जोरदार टिका केली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.