Vishwa Hindu Parishad Sarkarnama
विदर्भ

Nagpur VHP News : उदयनिधी स्टॅलिनच्या ‘त्या’ वक्तव्यावर विहिंप संतप्त, रस्त्यावर उतरून देणार चोख उत्तर !

Vishwa Hindu Parishad News: अराजकता निर्माण होऊन हिंदूंची स्थिती दयनीय झाली होती.

Atul Mehere

Nagpur Vishwa Hindu Parishad News: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. लगेच त्याचे पडसाद उमटले. स्टॅलिनच्या विरोधात विश्‍व हिंदू परिषद भडकली असून सनातन विरोधी षड्यंत्राला कायदेशीर आणि रस्त्यावर उतरून चोख उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत, असे विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे. (The condition of Hindus had become miserable due to chaos.)

आज (ता. सहा) सायंकाळी नागपुरातील विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यालयात शेंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. अगदी सुनियोजित पद्धतीने उदयनिधी स्टॅलिन, कार्ती चिदंबरम, केशवप्रसाद मौर्य, मल्लिकार्जुन खर्गे आदींचे सनातन धर्मावर टिका करताना वादग्रस्त वक्तव्ये येत आहेत. नेमकी हीच पद्धत काश्‍मीरमध्ये (Kashmir) अवलंबली गेली होती आणि अराजकता निर्माण होऊन हिंदूंची स्थिती दयनीय झाली होती.

पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार, नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे, केंद्रीय प्रवक्ता तथा कोकण प्रांत सहमंत्री श्रीराज नायर उपस्थित होते.

यापुढे अशा प्रकारच्या सनातन विरोधी कुठल्याही षड्‍यंत्राला कायदेशीर आणि रस्त्यावर उतरून चोख उत्तर द्यायला विश्‍व हिंदू परिषद सर्व सनातनींच्या सहकार्याने सक्षम आहे. या राजकीय (Political) लोकांनी आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. राजकीय पक्षांनी हिंदू समाजाला गृहीत धरून हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान करू नये. यापुढे तो खपवून घेतला जाणार नाही.

सनातन धर्माला कलंक लावण्याचा प्रयत्न विश्‍व हिंदू परिषद आपल्या नेतृत्वात सर्व सनातनी हिंदूंच्या साहाय्याने निष्प्रभ करेल. जो सनातन धर्म इस्लामच्या तलवारीला घाबरून नष्ट झाला नाही, इंग्रजांच्या दडपशाहीपुढे झुकून नष्ट झाला नाही, तो या स्वार्थी धर्मद्रोही, ढोंगी राजकारण्यांच्या वक्तव्याने नष्ट होणे कदापि शक्य नाही, असे गोविंद शेंडे म्हणाले.

काय म्हणाले होते स्टॅलिन?

शनिवारी (ता दोन) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं होतं. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं मल्लिकार्जुन खरगे यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांनी समर्थन केलं होतं.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT