Nagpur Assembly Session  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session 2023 : विधानसभेत ‘या’ नऊ माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून कामकाज स्थगित

Vijaykumar Dudhale

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन गाजणार हे दाखवून दिले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देत सरकारही पूर्ण तयारीने आल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेच्या माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मंजूर करून आजचे सभागृहातील कामकाज संपविण्यात आले. (Assembly adjourned to condole death of nine former members)

राज्यात थंडीची लाट असतानाही उपराजधानीतील राजकीय वातावरण मात्र हिवाळी अधिवेशनामुळे चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही, असे सांगून फडणवीसांनी पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांना पंक्चर करण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लेईंग संपण्यापूर्वीच विरोधी बाकांवरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला हा सूचनेचा विषय हा स्थगन प्रस्तावात बसणारा नाही. पण, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधी पक्षनेत्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. उद्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव येऊ शकतो, त्या वेळी शेतकरी प्रश्नावर चर्चा घेऊ, असे उत्तर देऊन चर्चा करण्यास विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी नकार दिला.

गोवर्धन मांगीलाल शर्मा (अकोला पश्चिम, माजी राज्यमंत्री), बबनराव दादाबा ढाकणे (पाथर्डी माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उपाध्यक्ष), माजी आमदार सर्वश्री गुलाबराव वामनराव पाटील (अमळनेर), श्रीपतीराव दिनकर शिंदे (गडहिंग्लज), शेख रशीद शेख रफी, राजाराम नथू ओझरे (डहाणू), वसंतराव जनार्दन कार्लेकर (वर्धा), गोविंद रामजी शेंडे (भंडारा), दिगंबर नारायण विशे (मुरबाड) या माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडला.

शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृह स्थगित केले. विधानसभेचे कामकाज उद्या सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT