Assembly Winter Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शिरसाट, तुपे, ठाकूर, कुणावर यांच्यावर मोठी जबाबदारी

Nagpur Winter Session 2023 : अधिवेशन सुरळीत चालवण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांसह या नवनिर्वाचित तालिका अध्यक्षांची असणार आहे.
Speaker of Assembly
Speaker of AssemblySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : गुलाबी थंडीत गुरुवारपासून (ता. ७ डिसेंबर) उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार संजय शिरसाट, समीर कुणावर, चेतन तुपे, ॲड. यशोमती ठाकूर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अधिवेशन सुरळीत चालवण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांसह या नवनिर्वाचित तालिका अध्यक्षांची असणार आहे. (Assembly Winter Session 2023 : Shirsat, Kunawar, Tupe, Adv Thakur elected as Speaker of Assembly)

नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेनाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या कामाची रूपरेषा पुकारली. कोणत्या सदस्याला किती वेळ बोलता येणार, याबाबतची माहिती दिली. तसेच, अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकाची माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Speaker of Assembly
Vijaykumar Gavit News : विजयकुमार गावित यांच्यावर कारवाईऐवजी मंत्रिपदाचे बक्षीस?

ॲड. नार्वेकर यांनी कामकाज पुकारल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याची अनुमती मागितली. मात्र, कामकाजाची रूपरेषा पुकारल्यानंतर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना बोलण्याची संधी दिली. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. शेतकरी आत्महत्या, अवकाळी पाऊस आणि सरकारी मदत यावर त्यांनी ताशेरे ओढले.

दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी विधानसभा नियम आठच्या पोटनियम एक अन्वये विधानसभेच्या तालुकाध्यक्षांची निवड करण्यात येते. त्यानुसार आज विधानसभेचे काम चालू झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चार सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार आमदार संजय शिरसाट, समीर कुणावर, ॲड. चेतन तुपे, ॲड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे.

Speaker of Assembly
BJP Political News : 'छोटा राजन'चा साथीदार मंदार बोरकर आता भाजपमध्ये

आमदार संजय शिरसाट हे शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. ॲड. चेतन तुपे यांनी आपली भूमिका अजून जाहीर केलेली नाही. ते अजूनही दोन्ही गटांतील नेत्यांना भेटत असतात. यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आमदार आहेत. समीर कुणावर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.

Speaker of Assembly
Winter Session 2023 : शिवसेनेतील फुटीनंतर अधिवेशनात उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com