Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session 2023 : आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; विरोधकांचा सभात्याग

Sudesh Mitkar

Nagpur News : राज्यातील आरोग्य विषयक प्रश्नांवरून बुधवारी विधानसभेत सत्ताधारी-विरोधकात खडाजंगी झाली. आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने राज्यातील बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलेला डेंग्यू झालेला असतानाही उपचार करण्यात आले नाहीत. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलांचा मृत्यू झाला. यासारखे प्रकार सातत्याने घडत असून आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील बिघडलेला आरोग्य विभागाच्या कारभाराचा गाडा ट्रॅकवर आणण्यसाठी दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी करत यावेळी करण्यात आली. मात्र त्याबाबत अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचे सांगत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

आरोग्य मंत्री सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत अभ्यास करुन येत नाहीत. त्यामुळे केवळ चौकशी करतो असे सांगून वेळ मारुन नेहतात, असा देखील आरोप त्यांनी केला. तसेच राज्यभरात आरोग्य विभागात रिक्त पदांचा मुद्दा विरोधकांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्याचा आरोग्य विभाग सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT