Bunty Shelke Sarkarnama
विदर्भ

Nagpur Youth Congress : युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवाची राजकीय कारकीर्द धोक्यात? काय आहे प्रकरण!

Bunty Shelke Nagpur News : आक्रमक आंदोलन करणारा युवा नेता म्हणून ओळख असलेल्या युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : आक्रमक आंदोलन करणारा युवा नेता म्हणून ओळख असलेल्या युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभेत पराभव झाल्यानंतर थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असा थेट आरोप केला होता. आता त्यांच्या विरोधात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती तसेच सनदी अधिकारी संजय मिना यांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते.

बंटी शेळके दुसऱ्यांदा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहे. २०१९च्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरातून ते महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होत. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवारास पराभूत केले होते. याचे बक्षीस त्यांना काँग्रेसने दिलेही. त्यांना थेट विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

अलीकडे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 80 हजार मते घेतली. मात्र भाजपच्या प्रवीण दटके (Praveen Datake) यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही असा त्यांचा आरोप आहे. आपल्या पराभवास बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच जबाबदार धरले. आपल्या मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात पाठवले. एकही सभा घेतली नाही. प्रचारात सहभागी झाले नाहीत. अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली असल्याचा बंटी शेळके (Bunty Shelke) यांचा आरोप आहे.

त्यांच्या विरोधात नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. बंटी शेळके दिल्ली तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ते आक्रमक आंदोलन करतात. प्रसंगी लाठ्या काठ्याही खातात. भाजपच्या विरोधात बेछूट आंदोलने करतात. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचीसुद्धा मोठी फळी आहे. काँग्रेसच्या युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र अतिउत्साह आणि उताविळपण तसेच अपरिपक्वता यामुळे त्यांचे राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT