Nagpur ZP News : नागपूर ZP मध्ये ‘ऑपरेशन लोटस'; काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पडणार?

BJP Operation Lotus Congress NCP Sharad Pawar : सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 32 सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजप 14 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य आहेत.
Nagpur ZP Election
Nagpur ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा जिंकल्यानंतर भाजपने आता आपले सर्व लक्ष नागपूर जिल्हा परिषदेवर केंद्रित केले आहे. निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात ऑपरेशन लोटस राबवण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अनेक माजी जिल्हा परिषद सदस्यांसोबत संपर्क सुरू केला आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ जवळपास संपुष्टात आला आहे.

नव्याने निवडणूक जाहीर होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसच्या ठरावाला भाजपच्या सदस्यांनीसुद्धा एकमताने पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषदेचा प्रस्ताव सध्य राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

Nagpur ZP Election
Baba Siddique Murder Case : ...तर बाबा सिद्दीकी यांचा जीव वाचला असता! चार्जशीटमध्ये महत्वाचे खुलासे

भाजपची जिल्हा परिषदेत सत्ता असताना सुमारे तीन वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. न्यायालयाने राज्य शासनाला मुदतवाढ देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता काँग्रेसच्या ठरावानुसार विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 32 सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजप 14 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदही भाजपला गमवावी लागली होती. राज्यातील सत्तेचा मोठा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झाला होता. आता राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता येणार असे बोलले जात आहे.

Nagpur ZP Election
Nagpur NCP News : 'सार्वजनिक'च्या अधिकाऱ्यांकडे दोन-दोन लाखांचे मोबाईल; अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा 'कमिशन'च्या आरोपाने खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे नागपूरचे आहेत. नागपूर जिल्ह्यावर वर्चस्व राखणारे माजी मंत्री सुनील केदार विधानसभेत पराभूत झाले आहेत. त्यांच्याही सावनेर मतदारसंघात भाजपचे आशिष देशमुख हे निवडून आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना भाजप महायुतीचे वेध लागले आहे. भाजपलाही नागपूर जिल्हा परिषदेत जोरदार कमबॅक करायचे आहे. त्यामुळे काही दमदार व विजयाची अधिक शक्यता असलेल्या सदस्य आणि इच्छुकांना भाजपात आणण्याचे प्रयत्न जोरात सुरू असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com