ZP Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur ZP News : शासकीय निवासस्थानातील फर्निचर नेले घरी; ‘त्या’ माजी सभापती पुन्हा झाल्या टारगेट !

Radha Agrawal : भाजपच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला.

सरकारनामा ब्यूरो

The furniture that was taken was returned : जिल्हा परिषद सभापतींच्या निवासस्थानामधील गायब झालेल्या फर्निचरचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. भाजपच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. माजी शिक्षण सभापती तसेच माजी महिला व बाल कल्याण सभापतींनी फर्निचर घरी नेले होते. (The issue of taking furniture home became a hot topic in political circles)

सरकारी निवासस्थानातील फर्निचर घरी नेल्याचा मुद्दा राजकीय (Political) वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला. हा प्रकार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आहे. पण आजही याची चर्चा होते. कालच्या (ता. १६) सर्वसाधारण सभेत पुन्हा यावर चर्चा झाली. नेलेले फर्निचर परत आले, असे स्पष्टीकरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांनी दिले. पण त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींची पदे आहेत. सर्वांसाठी शासकीय निवासस्थानाची व्यवस्था आहे. या निवासस्थानात प्रशासनाकडून महागडे फर्निचर, साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वी सभापती पदावर चार नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पदावर असताना येथील फर्निचरवर काही सभापतींचा जीव जडला. त्यांनी सोफा, बेड, ड्रेसिंग टेबलासह काही साहित्य नेले.

याबाबत विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर संबंधित माजी सभापतींनी फर्निचर परत केले. परंतु एका सभापतींनी फर्निचर परत केले नाही. ते त्यांनी आपल्या मुलीला दिल्याची चर्चा त्यानंतर रंगली होती. त्यांनी दुसरेच अन् हलक्या दर्जाचे फर्निचर परत दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आजही होते.

आता राधा अग्रवाल यांनी मुद्दा उपस्थित केला. सुभाष गुजरकर यांनीही विषय लावून धरला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी यावर अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले. परंतु अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तर देण्यात आले.

त्यानंतर त्यांनी तत्कालीन महिला व बाल कल्याण सभापती, शिक्षण व वित्त सभापतींनी फर्निचर नेले होते. ते परत केले. जे फर्निचर नेले तेच परत केले, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांनी दिले. फर्निचर परत केल्याचे स्पष्ट केल्यानंतर संजय झाडे यांनी विषय संपविण्याची विनंती केली. यामुळे काही सत्ताधाऱ्यांसह इतर सदस्यांचा हिरमोड झाला.

सर्व फर्निचर परत केल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली. परंतु त्यावर शंका आहे. विद्यमान सभापतींनी फर्निचर अभावी निवासस्थान स्वीकारले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सीईओंकडे करणार असल्याचे जिल्हा परिषद (ZP) सदस्य राधा अग्रवाल म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT