Nagpur ZP News : माजी सभापतीने काढला माजी मंत्र्याचा बाप, नंतर उडाली शाब्दिक चकमक!

Congress : नागपूर जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे.
Nagpur ZP
Nagpur ZPSarkarnama
Published on
Updated on

Three groups are lying in Nagpur ZP : नागपूर जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. असे असताना जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत सुरू आहे, असे वरकरणी दिसते. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी नाही. येथे सरळ सरळ तीन गट पडलेले आहेत. परवा-परवा एका विषय समितीच्या बैठकीत एका माजी मंत्र्याचा बाप काढला. त्यानंतर सभागृहात मोठी शाब्दिक चकमक उडाली. (Congress has single handed power in Nagpur Zilla Parishad)

या प्रकारानंतर जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. एका जागेच्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांमधील दोन गटातील सदस्यच आपसात भिडले. माजी सभापतीने जागेवरून चक्क बापच काढला. यामुळे सदस्य व माजी सभापतीमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांची सहा पदे आहेत. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींचे पदे आहेत. मागील वेळी पदावर असलेले सर्व माजी पदाधिकाऱ्यांना एका विषय समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची (Congress) एकहाती सत्ता असली तरी येथे तीन गट कार्यरत आहे.

मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत (ZP) एका विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत माजी सभापतीने जागेचा विषय उचलून धरला. संबंधित जागा खासगी संस्थेला देण्यात त्यांना विरोध दर्शविला. विशेष म्हणजे संबंधित जागा देण्यास ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला आहे. संबंधित विषय अजेंड्यावर नसताना सुद्धा माजी सभापतीने तो उचलून धरत अप्रत्यक्षपणे एका माजी मंत्र्यालाच लक्ष्य केले.

Nagpur ZP
Nagpur ZP News : ‘५० खोके...’ नंतर जिल्हा परिषदेत गाजत आहे ‘१५ टक्के, एकदम ओक्के...’

‘जागा कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या बापाला मिळणार नाही’, असे वक्तव्य केले. त्यानंतर बैठकीतील सत्ताधारी पक्षातील दुसऱ्या सदस्याने त्यावर आक्षेप घेत ‘असे शब्द वापरू नका’ असा सल्ला दिला. परंतु संबंधित माजी सभापती चांगल्याच आक्रमक होत्या. त्यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. इतर सदस्यांना त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुठे प्रकरण शांत झाले. दोन्ही सदस्य दोन वेगवेगळ्या गटांतील असल्याचे सांगण्यात येते.

वादग्रस्त राहिलेल्या आहेत सभापती..

या सभापतींचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त राहिला होता, अशी चर्चा आहे. पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी शासकीय निवासस्थानातील फर्निचर व इतर साहित्य घरी नेले होते. यावरून विरोधी पक्षाने त्यांना लक्ष्य केले होते. हा विषय तेव्हा चांगलाच गाजला होता.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com