Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole Vs Devendra Fadnavis आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात नाना पटोलेंची उडी; फडणवीसांना फटकारले, म्हणाले...

Anil Deshmukh : राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आताचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

Rajesh Charpe

Maharashtra Political News : देशात मोदी सरकार आल्यापासूनच राजकारणाची स्थिती बदलली आहे. जे सरकारच्या विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. ईडी, सीबीआयाचा गैरवपार केला.

आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पेन ड्राईव्ह दाखवून धमकावत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे. त्याच अनुषंगाने राज्यात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आताचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. फडणवीसांनी आपल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरोधातील आरोप पत्रांवर स्वाक्षरीचा दाबाव आणल्याचा आरोप देशमुखांनी केला.

त्यावर माझ्याकडे देशमुख हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलले आहेत, याची ध्वनीफित असून ती योग्य वेळी बाहेर काढणार असल्याचा इशारच फडणीसांनी दिला. यावरून काँग्रेसचे नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्यावतीने रोज प्रयत्न केले जात होते. रोज कोणाच्या तरी घरी ईडीच्या धाडी टाकल्या जात होत्या. हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. ईडी व सीबीआयला घाबरून जे महायुतीत गेले त्यांना क्लिनचिट देण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचाही समावेश आहे.

खासदार रवींद्र वायकर यांनी मी नाईलाजाने शिंदे सेनेत गेल्याचे सांगितले आहे. त्यावरून भाजपचा किती दबावर नेत्यांवर होते हे स्पष्ट होते. अनिल देशमुख यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर घरावर छापे टाकण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. त्यामुळे देशमुखांनी काल जे आरोप केलेले आरोप ते खरे असावे, असेही नाना पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जाहीर केले पाहिजे. वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे. मात्र ते गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी करत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात, पैसा कुठून आणयाचा. याचा अर्थ त्यांनी राज्य गहाण ठेवले आहे, हे स्पष्ट होते.

समृद्धी महामार्गातून सत्ताधारी हेच समृद्ध झाले आहेत. हा मार्ग लोकांच्या जीव घेणारा ठरला आहे, याकडेही पटोलेंनी Nana Patole लक्ष वेधले. दोन वर्षात रस्त्यावर भेगा पडल्या आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये कोण जास्त पैसे खातो याची स्पर्धा लागली आहे, असा टोलाही पटोलेंनी लगावला.

राज्यात नैसर्गिक आपत्ती सुरू आहे. काही भागात पूर परिस्थिती आहे. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. शिक्षक भरती केली जात नाही. याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. या गंभीर बाबींकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पेन ड्राईव्ह, ऑडिओ, व्हिडिओ सत्ताधाऱ्यांमार्फत काढल्या जात असल्याचा हल्लाबोल नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांवर केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT