Supriya Sule: सुप्रिया सुळे प्रशासनावर 'बरसल्या'; पुण्यात पावसाचा हाहा:कार, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी...

Supriya Sule on Pune Rain Alert Heavy Rainfall: पुण्यात एवढा पाऊस पडणार होता तर प्रशासनाने जनतेला अर्लट करायला पाहिजे होते. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना माहिती दिली असती तर त्यांचे स्थलांतर करता आले असते....
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुण्यातील (Pune Heavy Rainfall) अनेक परिसरात पाणी शिरले आहे. पुण्यातील पुरपरिस्थितीवरुन खासदार सुप्रिया सुळे या स्थानिक प्रशासनावर 'बरसल्या'

पुण्यात एवढा पाऊस पडणार होता तर प्रशासनाने जनलेला अलर्ट करायला पाहिजे होते. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना माहिती दिली असती तर त्यांचे स्थलांतर करता आले असते. समाजमाध्यमांचा उपयोग करुन प्रशासनाने नागरिकांना सतर्क करणे गरजेचे होते, असे सुळे म्हणाल्या.

पुण्यात नदी सुधार, नदी जोड असे अनेक पायाभूत मोठे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली. पावसाचा अलर्ट असल्यामुळे पुणेकरांनो, घराच्या बाहेर पडू नका, अशी आवाहन त्यांनी केले.

मुसळधार पावसामुळे पुणे जलमय झाले आहे. अनेक परिसरामध्ये कमरेइतकं पाणी साचले आहे. सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे.

Supriya Sule
Maval assembly election 2024: मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? निवडणुकीपूर्वीच भाजपकडून बॅनरबाजी

अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारउपयोगी साहित्य खराब झाले आहे. पुणेकरांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे आहेत. पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये पहाटेपासूनच नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील एकता नगरमध्ये लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. एनडीआरएफचे जवान पहाटेपासून मदत कार्य करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com